कुडाळात गांधी, शास्त्री यांना नाथ पै संस्थेतर्फे अभिवादन

कुडाळात गांधी, शास्त्री यांना नाथ पै संस्थेतर्फे अभिवादन

Published on

15913

कुडाळात गांधी, शास्त्री यांना
नाथ पै संस्थेतर्फे अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ ः सत्य, हिंसा, सत्याग्रह या तत्त्वाचा पुरस्कार करत स्वच्छतेचा संदेश जगभरामध्ये दिला व अहिंसेचा संदेश दिला, ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व राष्ट्राच्या जडणघडणीसाठी सैनिक व शेतकरी हे महत्त्वाचा मानून ज्यांनी आजन्म राष्ट्रहिताचेच कार्य केले, ते माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांतर्फे शैक्षणिक भवन परिसर स्वच्छता करून त्यांना अभिवादन केले. सुरुवातीला दीपप्रज्वलन करून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. प्रा. अरुण मर्गज यांनी, अहिंसेचा मार्गच जगाला विनाशापासून वाचवू शकतो, हे जगाला आपल्या आचरणातून दाखवून देणारे महात्मा गांधी व देशाच्या प्रगतीमध्ये संरक्षण करणारे सैनिक आणि अन्नाची गरज भागविणारे शेतकरी यांना महत्त्व देऊन ''जय जवान जय किसान'' हा मंत्र देणारे लालबहादूर शास्त्री यांचे विचार कृतीत आणण्याची गरज व्यक्त केली. व्यासपीठावर प्रा. परेश धावडे, प्रा. चैताली बांदेकर, प्रा. पूजा मेस्त्री, प्रा. प्रथमेश हरमलकर, डॉ. प्रत्युषरंजन, डॉ. ज्योतीरंजन पलटासिंग, प्रसाद कानडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com