कनकाडी रस्त्याची तात्पुरती डागडुजी

कनकाडी रस्त्याची तात्पुरती डागडुजी
Published on

- rat३p१९.jpg-
२४N१५९१७
साखरपा : दाभोळे कनकाडी रस्त्याची खड्डे भरताना कर्मचारी
---------

दाभोळे-कनकाडी रस्त्याची डागडुजी
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ३ : पावसामुळे आणि अवजड वाहतुकीमुळे दाभोळे-कनकाडी रस्त्यावर पडलेले खड्डे तात्पुरत्या स्वरुपात बुजवण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दाभोळे-कनकाडी हा सुमारे दीड किलोमीटरच रस्ता या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तीस लाख खर्च करून नव्याने बांधण्यात आला. यात रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकारण करण्यात आले. पण पावसाळ्यात या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. या रस्त्यावर भरावाची माती वाहून गेल्यामुळे एकेठिकाणी सुमारे चार फूट रुंदीचा मोठा चर पडला होता. या रस्त्यावर सातत्याने डंपरची वाहतूक सुरू असते. या वाहतुकीमुळे हा रस्ता जागोजागी उखडला होता. ठिकठिकाणी तयार झालेले खड्डे आणि गणपतीपूर्वी त्या खड्यांमध्ये टाकण्यात आलेली मोठी खडी त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी आणखीच धोकादायक झाला होता. या खाडीवरुन वाहने घसरून लहान मोठे काही अपघातही झाले होते. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी सातत्याने होत होती. त्या मागणीला प्रतिसाद देत या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले आहेत. त्यामुळे सध्यातरी या मार्गावरून वाहतूक सुरळीत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com