निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

निवृत्त पोलिस अधिकारी, 
कर्मचाऱ्यांचा सत्कार
Published on

निवृत्त पोलिस अधिकारी,
कर्मचाऱ्यांचा सत्कार
सिंधुदुर्गनगरी, ता.४ ः सिंधुदुर्ग पोलिस दलात उत्कृष्टरित्या प्रदीर्घ सेवा बजावून निवृत्त झालेल्या पोलिस अधिकारी व अंमलदारांचा जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या हस्ते नुकताच पोलिस अधीक्षक कार्यालय येथे सत्कार करण्यात आला.
सिंधुदुर्ग पोलिस दलातून निवृत्त झालेले अधिकारी प्रकाश महाले-सहायक पोलिस निरीक्षक, दहशतवाद विरोधी शाखा सिंधुदुर्ग, बापू खरात-पोलिस उपनिरीक्षक कणकवली, गुरुनाथ भागवत-पोलिस उपनिरीक्षक सावंतवाडी, संदिप पडेलकर- सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजयदुर्ग, अजित घाडी-सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा हे सर्व त्यांच्या कुटुंबासह निवृत्ती कार्यक्रमास हजर होते. निवृत्त अधिकारी व अंमलदारांनी आपले मनोगत व्यक्त करताना, पोलिस दलातील जवळपास ३५ वर्षे केलेल्या प्रदीर्घ सेवेमुळे आपली सर्वोतोपरी प्रगती करु शकलो. आव्हानात्मक परिस्थितीत वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार संयमाने व धाडसाने केलेल्या कामकाजामुळे जनतेची सेवा करु शकल्याबाबत समाधान व्यक्त केले. पुढील आयुष्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्याचे, सेवाभावी वृत्तीने समाजात सदैव कार्यरत राहुन समाजसेवा करण्याचे तसेच पोलिस दलातील अनुभवाचा फायदा समाजासाठी व नवीन पोलीस अधिकारी व अंमलदारांना देण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक अग्रवाल यांनी केले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व आंब्याचे रोपटे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com