आंबा, काजू उत्पादकांना डिझेल परतावा द्या

आंबा, काजू उत्पादकांना डिझेल परतावा द्या
Published on

१५९२६

आंबा, काजू उत्पादकांना डिझेल परतावा द्या
सदाशिव ओगले : जनता दरबारात पालकमंत्र्यांचे वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३ : मच्छीमारांना ज्या पद्धतीने डिझेल परतावा दिला जातो, त्याप्रमाणेच जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांना रॉकेल व डिझेल परतावा मिळाला पाहिजे, अशी मागणी भाजपचे माजी सभापती सदाशिव ओगले यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली. या मागणीचा विचार करण्यात येईल, असे आश्‍वासन पालकमंत्री चव्हाण यांनी दिले असल्याची माहिती श्री. ओगले यांनी दिली.
पालकमंत्री चव्हाण यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी घेतलेल्या जनता दरबारमध्ये या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. श्री. ओगले यांच्या माहितीनुसार, मच्छीमारांना डिझेल परतावा मिळतो. त्याप्रमाणे आंबा आणि काजू उत्पादकांना रॉकेल व डिझेल परतावा शासनाकडून देण्यात यावा, अशी मागणी केली. आंबा उत्पादक शेतकरी फवारणीसाठी लाखो रुपयांचे रॉकेल किंवा डिझेल वापरत आहेत; परंतु मजुरी व औषधे यांच्या किमती भरमसाट वाढत असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस येत आहेत. त्यातच बदलत्या हवामानामुळे उत्पादन त्यामानाने कमी होत आहे. विमा कंपन्यांकडून जी तुटपुंजी मदत मिळते, ती सुद्धा परवडत नाही. यामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत आहे. शेतकऱ्यांनी आधार व मदत म्हणून राज्याने मच्छीमारांप्रमाणे आंबा बागायतदारांना रॉकेल व डिझेल परतावा द्यावा, अशी मागणी पालकमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. याचा विचार करण्यात येईल, असे आश्‍वासन पालकमंत्र्यांनी दिले.
त्याचप्रमाणे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची मिळणारी रक्कम जानेवारी २०२२ पासून बंद झाली आहे. त्याबाबतही संबंधितांना आदेश देण्यात आले आहेत. खुडी व कोटकामते गावांतील शेतकऱ्यांची आणि तालुक्यातील जी कच्ची घरे आहेत, ती तातडीने प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर करावीत, अशी मागणी करण्यात आली असल्याचेही श्री. ओगले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com