कलाकार मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

कलाकार मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
Published on

15928


कलाकार मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
वाडा, तळेबाजारात उपक्रम : विविध क्षेत्रांतून १९२ जणांची नोंदणी
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३ : तालुक्यातील कलाकारांच्या हितासाठी व विविध शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी विभागवार कलाकार मेळावे घेण्यात आले. वाडा व तळेबाजार येथे हे मेळावे झाले.
तळेबाजार येथे तळवडेचे सरपंच आबा रुमडे व माजी सरपंच पंकज दुखंडे यांच्या संयोजनातून तर वाडा हायस्कूल येथे हर्षद जोशी, प्रियांका वेलणकर व भाजप किसान मोर्चा पडेल मंडलचे सरचिटणीस सतीश जाधव यांच्या संयोजनातून मेळावे घेण्यात आले. कोकणातील कलाकारांना शासनाच्या योजना समजाव्यात व त्यासाठी लागणाऱ्याया कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सहकार्य करणे याबरोबरच प्रत्येक कलाकाराला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कलाकार महासंघ कार्य करील, असे भाई बांदकर यांनी यावेळी सांगितले. या दोन्ही कार्यक्रमांत गुरुदेव परुळेकर यांनी कलाकारांसाठी असलेल्‍या शासकीय योजना सविस्तर सांगितल्या. कलाकार महासंघ कसा कार्यरत राहील, त्यावर भाष्य केले. कृष्णा बांदकर यांनी सविस्तर माहिती दिली. वाडा येथील कार्यक्रमात प्रकाश गोगटे उपस्थित होते. या कार्यक्रमास भाजप किसान मोर्चा देवगड मंडलचे उपाध्यक्ष जितेंद्र उपरकर, ज्येष्ठ कलाकार विद्याधर कार्लेकर, संजीव राऊत, तसेच गावातील भजनीबुवा, फुगडी मंडळे, तळवडे गावातील तमाशा कलाकार, तसेच विविध क्षेत्रांतील कलाकार उपस्थित होते. तळेबाजार येथील सूत्रसंचालन पंकज दुखंडे यांनी केले. तर आभार आबा रुमडे यांनी मानले. वाडा येथील सूत्रसंचालन प्रियांका वेलणकर यांनी केले. तर आभार हर्षद जोशी यांनी मानले. या दोन्ही कार्यक्रमांतून विविध क्षेत्रांतील १९२ कलाकारांची नोंदणी झाल्याची माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com