

15939
राज्यस्तरीय शैक्षणिक स्पर्धेत
शिक्षिका आयुषा झेंडेंचे यश
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १० ः मातोंड-बांबर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ५ च्या शिक्षिका सौ. आयुषा अरविंद झेंडे यांचा
राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत राज्यात तृतीय क्रमांक आला.
भाषा या विषयांतर्गत ही स्पर्धा होती. यात त्यांना वेंगुर्ले तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. राज्यस्तरावर या स्पर्धेत त्या तृतीय आल्या. तिसरी ते पाचवी परिसर अभ्यास विषयात तालुकास्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त झाला. या यशाबद्दल पुणे येथे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्राच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सहसचिव अर्चना अवस्ती यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सहसचिव अवस्ती, राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, योजना कार्यालयाचे संचालक महेश पालकर, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाचे संचालक शरद गोसावी, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक संपत सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे, परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, डॉ. माधुरी सावरकर, ज्योती शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अभिव्याख्याता डॉ. नीता जाधव व डॉ. दिपाली जोगदंड यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.