स्वच्छता रॅलीस वेंगुर्लेत प्रतिसाद

स्वच्छता रॅलीस वेंगुर्लेत प्रतिसाद
Published on

वेंगुर्लेमधून केळूसची
‘सुंदर गाव’साठी निवड
म्हापणः आर. आर. (आबा) पाटील तालुका सुंदर गाव योजनेतंर्गत वेंगुर्ले तालुक्यातून केळूस गावाची निवड करण्यात आली. गावात विविध घटकांच्या उन्नतीकरिता होत असलेली विकासकामे, गाव पातळीवर प्रशासकीय दृष्टीने सर्व विभागांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम, वैविध्यपूर्ण व नाविन्यपूर्ण पद्धतीने घेण्यात येणारे कार्यक्रम, केळूस गावातील सर्व ग्रामस्थांनी दिलेली भक्कम साथ व सहभाग, गावात कार्यरत असणारे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी केलेले मोलाचे सहकार्य तसेच वेंगुर्ले पंचायत समिती व सिंधुदुर्ग जिल्हा परिषद स्तरावरून मिळालेले मार्गदर्शन या सर्वांच्या जोरावर केळूस गावाने आर. आर. (आबा) पाटील तालुका सुंदर गाव योजनेत सहभाग घेतला. जिल्हास्तरीय समितीकडून मूल्यमापन करून गुणानुक्रमे या योजनेंतर्गत केळूस गावाची निवड करण्यात आली. तालुकास्तरावरील या निवडीमुळे केळूस गाव १० लाख रक्कमेच्या बक्षिसास पात्र झाला आहे. केळूस गावाने यापूर्वीही अनेक अभियानांमध्ये सहभाग घेत विविध पुरस्कार पटकावले आहेत. वेंगुर्ले तालुक्यातून आर. आर. (आबा) पाटील तालुका सुंदर गाव योजनेतंर्गत केळूस गावाची निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

स्वच्छता रॅलीस
वेंगुर्लेत प्रतिसाद
वेंगुर्लेः स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस ''स्वच्छ भारत दिवस'' म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त ''स्वच्छता ही सेवा'' मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सोमवारी येथील रा. कृ. पाटकर हायस्कुल व वेंगुर्ले पंचायत समितीच्यावतीने स्वच्छता शपथ व स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावर्षी ''स्वच्छता ही सेवा'' कार्यक्रमांतर्गत स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही थीम निश्चित केली आहे. गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांनी या मोहिमेबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. प्रत्येक घटकाने स्वच्छता ही सेवा कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ग्रामपंचायत विस्तार अधिकारी गुरुनाथ धुरी, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, पाणी व स्वच्छता, तालुका समन्वयक द्रौपदी नाईक, मुख्याध्यापक एस. आर. धुरी, एम. एस. बोवलेकर जी. टी. बागुल, एस. जे. पेडणेकर, एस. एस. पिळणकर, एम. एम. खरात, एस. डी. परब, साईप्रसाद डॉ. सई लिंगवत, सखाराम दाभोलकर आदी उपस्थित होते.
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com