कनकाडीतील दिव्यांग तरुणास अनुनादतर्फे घरघंटी

कनकाडीतील दिव्यांग तरुणास अनुनादतर्फे घरघंटी

Published on

-rat३p२५.jpg-
२४N१५९६०
साखरपा ः प्रज्वल बांडागळे याला घरघंटी देताना अनुनाद फाउंडेशनच्या पूजा खांडेकर.
--------
कनकाडीत दिव्यांगास ‘अनुनाद’तर्फे घरघंटी

साखरपा, ता. ४ ः कनकाडी गावातील दिव्यांग तरुणास अनुनाद फाउंडेशनतर्फे घरघंटी भेट देण्यात आली. भविष्यात उदरनिर्वाहाचे साधन म्हणून त्यास त्याचा उपयोग होणार आहे. अनुनाद फाउंडेशन ही संस्था शिक्षण आणि महिला, तरुण सक्षमीकरण यासाठी कार्य करते. संगमेश्वर तालुक्यात अनेक शाळांना ई-लर्निंग सुविधा, विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप, कला आणि शैक्षणिक उपक्रम, मूल्याधारित शिक्षण उपक्रम असे कार्यक्रम संस्थेतर्फे केले जातात. या संस्थेतर्फे कनकाडी गावातील शिंदेवाडी येथील प्रज्वल बांडागळे या दिव्यांग तरुणास मोफत घरघंटी देण्यात आली. त्या वेळी अनुनाद फाउंडेशनच्या पूजा खांडेकर, प्रज्वलची आई, वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com