

-rat३p२०.jpg-
२४N१५९४३
राजापूर ः आरती स्पर्धेतील विजेत्या दत्त प्रासादिक मंडळाला बक्षिस देऊन गौरवताना मान्यवर.
---------
आरती स्पर्धेत दत्त प्रासादिक मंडळ प्रथम
राजापुरात आयोजन : कोंड्ये मंडळ द्वितीय, कोतापूर मंडळ तृतीय
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ ः राजापूर तालुका ब्राह्मण सेवा मंडळाच्यावतीने आयोजित आरती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेमध्ये सोलगाव येथील दत्त प्रासादिक मंडळाने प्रथम तर ब्रह्मदेव आरती मंडळ कोंड्ये आणि प्रारंभ महिला मंडळ कोतापूर यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले. आडिवरे येथील सत्येश्वर आरती मंडळ आणि शिवणेखुर्द येथील श्री देवी चौंडेश्वरी आरती मंडळाने उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावली.
शहरातील राजापूर हायस्कूलच्या कलामंदिर सभागृहात ही स्पर्धा झाली. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, चषक व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या वेळी राजापूर तालुका ब्राह्मण सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण करंबेळकर, माजी मुख्याध्यापक विनोद करंदीकर, राजापूर नगर वाचनालयाचे अध्यक्ष प्रभात पाध्ये, वाचनालयाचे कार्यवाह जयंत अभ्यंकर, राजापूर तालुका ब्राह्मण सेवा मंडळाचे उपाध्यक्ष संजय दाते आदी उपस्थित होते. परीक्षक म्हणून उदय गोखले, प्रसाद शेवडे यांनी काम पाहिले.
---------
वादकांचाही गौरव
आरती स्पर्धेत सहभागी झालेल्या मंडळांना उत्कृष्ट वादनाची साथ देणाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. त्यामध्ये उत्कृष्ट तबलावादक म्हणून अमेय हर्डीकर (दत्त प्रासादिक मंडळ), उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून प्रशांत जोशी (ब्रह्मदेव आरती मंडळ), उत्कृष्ट ऑर्गनवादक म्हणून उमाशंकर दाते (सत्येश्वर आरती मंडळ) यांना गौरवण्यात आले. बालमित्र आरती संघ गोवळ या लहान मुलांच्या संघाला परीक्षक उदय गोखले यांनी बक्षिस देत सन्मानित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.