स्वराज्यसंस्थेकडून भवानगडची स्वच्छता

स्वराज्यसंस्थेकडून भवानगडची स्वच्छता
Published on

स्वराज्य संस्थेकडून
भवानगडची स्वच्छता

संगमेश्वर ः संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथील भवानगडावर स्वराज्य संस्था कोकणच्यावतीने बुधवारी श्रमदान करून स्वच्छतामोहीम राबवण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी नवरात्रोत्सवाच्या आधी श्री क्षेत्र भवानगडावर साफसफाई करून श्रमदान करण्यात आले. या वेळी संस्थापक अध्यक्ष अविनाश गुरव, चैतन्य रेडीज, प्रथमेश कडवईकर, सोहम नाखरेकर, किरण कडवईकर, ऋग्वेद कडवईकर, सोयम कडवईकर, भावेश कडवईकर उपस्थित होते.
------
प्रथमेश, संस्कार, हर्षचे
शूटिंग स्पर्धेत यश

सावर्डे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण परिषद (सीबीएसई) अंतर्गत शाळांच्या नेमबाजी (शूटिंग) स्पर्धेत डेरवण (ता. चिपळूण) येथील क्रीडा संकुलात सराव करणाऱ्या हर्ष बागवेने कास्यपदक पटकावले. प्रथमेश कदमने पाचवा, संस्कार शेडगेने सातवा क्रमांक पटकावला. हे विद्यार्थी इंग्रजी माध्यम शाळेतील आहेत. केरळ येथील साई कृष्णा पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या स्पर्धेत ८१९ खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेत यश मिळवणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना डेरवण येथील प्रशिक्षक सागर साळवी यांचे मार्गदर्शन मिळाले होते. या खेळाडूंचे शाळेच्या संचालिका शरयू यशवंतराव, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, क्रीडा संयोजन समितीचे प्रशांत सावंत, अजित गालवणकर, योगेश विचारे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com