सती विद्यालयातील वक्तृत्व स्पर्धेत प्रांजल गुरव प्रथम

सती विद्यालयातील वक्तृत्व स्पर्धेत प्रांजल गुरव प्रथम
Published on

-ratchl३५.jpg-
२४N१५९८४
चिपळूण ः वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना गौरवताना मुख्याध्यापक अरविंद सकपाळ.
--------------
वक्तृत्व स्पर्धेत प्रांजल गुरव प्रथम

चिपळूण, ता. ३ ः सती चिंचघरी येथील सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या प्राथमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात प्रांजल गुरव, मैथिली राणे, आरव खालकर यांनी अनुक्रमे यश मिळवले. उत्तेजनार्थ म्हणून सई जोशी, साश्रिक ठसाळे, अरमान काणेकर यांना गौरवण्यात आले. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक वाचनालयातील पुस्तके वाचणाऱ्या सर्वांग देसाई व स्मित पिलवलकर यांना वाचकवीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शिक्षक मनोगतात शिक्षिका वृषाली राणे यांनी लालबहादूर शास्त्री व वर्षा सकपाळ यांनी लोकमान्य टिळक यांच्याविषयी अधिक माहिती दिली. मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांनी या महान व्यक्तींचे गुण अंगीकारण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com