पाळेकरवाडी शाळेचे खो-खो स्पर्धेत यश

पाळेकरवाडी शाळेचे खो-खो स्पर्धेत यश
Published on

15992

पाळेकरवाडी शाळेचे
खो-खो स्पर्धेत यश
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ३ः क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पाळेकरवाडी शाळेने प्रतिवर्षीप्रमाणे निर्विवाद वर्चस्व राखले.
स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात देवगड तालुक्यातून या संघाने जिल्हास्तरावर अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात मालवण संघाला पराभूत केले. पाळेकरवाडी मुलींच्या संघाची विभागस्तरासाठी निवड झाली.
मुख्याध्यापक किशोर त्रिंबककर यांच्यासह सहशिक्षक साळुंके, जाधव, सोनावणे, सुहासिनी पाळेकर, मेस्त्री यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या संघात सहावी व सातवीतून तनया पाळेकर, चैत्राली पाळेकर, अक्षरा पाळेकर, तेजस्वी पाळेकर, अनिका पाळेकर, स्वरा पाळेकर, आर्या पाळेकर, दुर्वा पाळेकर, मनस्वी पाळेकर, कनक मेस्त्री यांचा समावेश होता. या यशाबद्दल शाळेचे सर्व पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com