पावस पंचक्रोशीत नवरात्रोत्सवाचा उत्साह

पावस पंचक्रोशीत नवरात्रोत्सवाचा उत्साह
Published on

-rat३p३७.jpg-
२४N१६००९
पावस ः गणेशगुळे येथील लाडवाडीमध्ये बसवण्यात आलेली देवीची मूर्ती. (छाया ः संतोष लाड, गणेशगुळे)
-----------

पावस पंचक्रोशीत नवरात्रोत्सवास प्रारंभ

२० ठिकाणी मूर्तींची स्थापना ; मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ३ ः पावस परिसरामध्ये वाजतगाजत २० देवींच्या मूर्तीचे आगमन झाले असून, सात ग्रामदेवता मंदिरांमध्ये घटस्थापनेने नवरात्रोत्सवाची उत्साहात सुरवात करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी घरगुती घट बसवण्यात आले आहेत.
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला. त्यानंतर पावसाने तीन-चार दिवस हजेरी लावली होती. नवरात्रोत्सवावरही पावसाचे सावट आहे; परंतु गुरूवारी (ता. ३) घटस्थापनेच्या दिवशी पावसाने उघडीप घेतल्याने देवीच्या आगमनावेळी भाविकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. देवींच्या मूर्तींचे आगमन जल्लोषात व आनंदात झाले. पावस परिसरामध्ये २० देवींच्या मूर्तींचे आगमन होऊन प्रतिष्ठापना करण्यात आली. सात मंदिरांमध्ये घटस्थापना करून नवरात्रोत्सवाची सुरवात करण्यात आली आहे. देवीच्या मंदिरांमध्ये उत्सवकाळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com