सावंतवाडी मतदारसंघ ठाकरे शिवसेनेलाच

सावंतवाडी मतदारसंघ ठाकरे शिवसेनेलाच
Published on

16016

सावंतवाडी मतदारसंघ ठाकरे शिवसेनेलाच
जिल्हाप्रमुख बाबुराव धुरीः आम्हीच बलाढ्य असल्याचा दावा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ः कोणी कितीही दावा केला तरी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा ठाकरे शिवसेनेलाच सुटणार आहे. याठिकाणी आम्हीच बलाढ्य असून पुन्हा एकदा आमचाच आमदार निवडून आणणार असल्याचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आज येथे स्पष्ट केले. जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीकडून काहीच जाहीर झालेले नसताना हा मतदारसंघ मलाच मिळाला व मिळणार अशा पद्धतीच्या घोषणा करणे मुळात चुकीचे असल्याची टीकाही श्री. धुरी यांनी मित्र पक्षांच्या नेत्यांवर केली.
श्री. धुरी यांनी आज येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा समन्वयक चंद्रकांत गावडे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, जिल्हा संघटक शब्बीर मणियार, तालुका संघटक मायकल डिसोजा, अशोक परब, कौस्तुभ गावडे, लक्ष्मण आयनोडकर, संदेश वरक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. धुरी म्हणाले, "महाविकास आघाडीमध्ये जागावाटप करताना एका जिल्ह्याचा किंवा विभागाचा विचार झालेला नाही. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करून ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद जास्त किंवा ज्या पक्षाचा आमदार ठिकाणी त्या पक्षाला उमेदवारी देण्याचा फॉर्म्युला ठरला आहे. परंतु, आतापर्यंत कुठलीही जागा कोणाला सोडली याबाबतची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, या ठिकाणी मित्र पक्षांकडून ही जागा आपल्यालाच मिळाली आणि मिळणार अशा प्रकारची घोषणा करून त्या संदर्भात बोलणे हे मुळात चुकीचे आहे. मात्र, कोण दावाच करत असेल तर हा मतदारसंघ ठाकरे शिवसेनेलाच मिळणार आहे आणि तशा प्रकारचा प्रयत्न पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. राष्ट्रवादीला मतदारसंघ सुटल्यास वरिष्ठांच्या निर्णयाचा आदर राखूनही आम्ही काम करू."
ते पुढे म्हणाले, "स्थानिक आमदार दीपक केसरकर यांना आता पुन्हा इथली जनता स्वीकारणार नाही. त्यांनी गेल्या पंधरा वर्षात जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. आज ते नारायण राणे यांची पाठराखण करत आहेत, याचा अर्थ ते दहशतवादाखाली दाबले गेले आहेत. आज जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशत पसरवण्याचे काम काहींकडून होत आहे, हे दुर्दैव आहे. मात्र, मंत्री केसरकर हे यासंदर्भात काहीच बोलत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात जनतेने सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा एकदा शांत राहण्यासाठी जनतेने या दहशतीला उफाळून लावले पाहिजे. सासोली येथील जमिनीचा प्रश्न कोणाच्याही माध्यमातून सुटणे गरजेचे आहे. आम्ही सासोलीच्या ग्रामस्थांसोबत आहोत आणि यापुढेही राहणार. त्यामुळे त्या प्रश्नावर संदेश पारकर यांनी आवाज उठविला याचा अर्थ आमच्यामध्ये दोन गट आहेत असा कोणीही चुकीचा अर्थ काढू नये."
एका आमदाराच्या जीवावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यामुळे ठाकरे मुख्यमंत्री होणार असे बोलून सावंतवाडीच्या जागेवर दावा करणे योग्य नसून या ठिकाणी ठाकरे शिवसेनाच बलाढ्य असून इथला आमदार आमच्याच पक्षाचा आम्ही निवडून आणणार आहोत असा चिमटा त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामान यांचे नाव न घेता काढला. शनिवारी (ता.५) येथे येणार्‍या राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचे स्वागतच असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या टेंडरसाठी बाऊन्सर आणून राडा करणे हे जिल्ह्याच्या संस्कृतीला शोभणारे नसून या मागचा खरा सुत्रधार कोण0 याचा तपास होणे गरजेचे आहे. पोलीस यंत्रणेकडून तशा प्रकारचा प्रयत्न झाला नाही, यासाठी सोमवारी (ता.7) ठाकरे शिवसेना आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट
केसरकरांवर खालच्या पातळीवर टिका केली नाही
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राजकीयदृष्ट्या घेतलेला वैयक्तिक निर्णयामुळे ठाकरे शिवसेनेला त्रास झालाच्या निर्णयानंतर आम्ही वेळोवेळी केसरकरांवर टीका केली. मात्र, खालच्या पातळीवर कधीच टीका केली नाही आणि करणारही नाही. त्यांचे आणि आमचे संबंध आजही चांगले आहेत, असे स्पष्टोक्ती जिल्हाप्रमुख धुरी यांनी दिली. सासोली येथील संदेश पारकर यांच्या आंदोलनावरून केसरकरांनी त्यांच्या भूमिकेच्या केलेल्या समर्थनावरुन विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com