-लांजा शहरात सीसीटिव्ही नसल्याने चोरट्यांचे फावले

-लांजा शहरात सीसीटिव्ही नसल्याने चोरट्यांचे फावले
Published on

लांज्यातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

सीसी टीव्हीचा आभाव ; चोरटे सक्रीय
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ३ ः शहरात भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रॉयल पार्क कॉम्प्लेसमध्ये चोरट्याने सदनिकेचे कुलूप तोडून चोरी झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून कॅमेरे नसल्याने चोरट्याचे फावले आहे.
शहरात बऱ्याच दिवसांनी चोरट्यांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चोरांची भीती वाढली आहे. शहरातील रॉयल पार्क ही इमारत बसवेश्वर चौकनजीक आहे. सततच्या वर्दळ असणाऱ्या ठिकाणी ही इमारत आहे. अशा वर्दळीच्या ठिकाणी चोरटे चोरी करू लागले असल्याने पोलिसांपुढे अशा चोरट्यांना जेरबंद करणे आव्हान आहे. दरम्यान, बसवेश्वर चौक, बाजारपेठ, बसस्थानक, साटवली तिठा आदी मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असणे आवश्यक आहे. सार्वजनिक उत्सवावेळी वरिष्ठ प्रशासनाने नगरपंचायतीला सूचना केल्या; परंतु कोणतीही कार्यवाही नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com