

पूरग्रस्तांसाठी ठाकरे शिवसेना आक्रमक
खेडमध्ये उपोषण : मदत देण्याचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ३ : शहरात २०२३ व २४ मध्ये अतिवृष्टीमध्ये पूरपरिस्थितीमुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्याचे पंचनामेही झाले; परंतु सरकारकडून मदत न मिळाल्याने बुधवारी (ता. २) ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी सहकाऱ्यांसह खेड तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी नोव्हेंबरअखेर मदत देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
संजय कदम म्हणाले, २०२३ पासून हे सरकार व्यापाऱ्यांना व पूरग्रस्त नागरिकांना फसवत आहे. या फसव्या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत. प्रशासनाने सांगितले होते, गणपती अगोदर व्यापऱ्यांना नक्की मदत देऊ; मात्र गणपती विसर्जन होऊन नवरात्र आले तरीही हे सरकार अजून झोपलेले आहे. त्यामुळे अशा सरकारला जाग आणण्यासाठी साखळी उपोषणाला बसलो. या वेळी शहरप्रमुख दर्शन महाजन, राजन संसारे, पिंट्या जोशी, माजी नगराध्यक्ष अरविंद तोडकरी, संदीप नायकवडी, बापू खातू, विश्वास पाटणे, अजय धारिया आदींसह व्यापारी उपस्थित होते. तहसीलदार सोनवणे व निवासी नायब तहसीलदार सिनकर यांनी आंदोलकांची भेट घेतली. तहसीलदार सोनवणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. त्यानंतर पूरग्रस्त नागरिक व व्यापाऱ्यांना नोव्हेंबरअखेर मदत देण्याबाबत लेखी आश्वासन तहसीलदारांनी दिले.
---
कोट्यावधींची भरपाई थकीत
खेडमध्ये २०२३ मध्ये पूरपरिस्थितीमुळे ३९० जणांचे १ कोटी ५९ लाख ७४ हजार ५७५ रुपयांचे नुकसान झाले होते. २०२४ मध्ये ४८९ दुकानांचे ६ कोटी ९३ लाख ९ हजार ३१० रुपये व २०६ नागरिकांचे २० लाख ६० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे; मात्र सरकारने ८४ जणांना ३९ लाख ८५ हजार ५०० रुपये मदत देऊन पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.