''उमेद'' कर्मचाऱ्यांचे कामबंद

''उमेद'' कर्मचाऱ्यांचे कामबंद
Published on

16019

‘उमेद’ कर्मचाऱ्यांचे कामबंद
‘कायमस्वरुपी’ची मागणीः मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३ ः शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानास स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व केडर व कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरुपी सेवेत समाविष्ट करून घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी उमेद अभियानातील सर्व केडर व कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांनी आजपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे.
यापूर्वी १०, ११, १२ जुलैला आझाद मैदानावर धरणे आंदोलन, सर्व मंत्र्यांना निवेदने, २७ सप्टेंबरला पालकमंत्र्यांना निवेदन, असहकार आंदोलन अशाप्रकारे विविध प्रकारे आजपर्यंत आंदोलन करण्यात आली. परंतु, त्याला योग्य प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी काम बंद आंदोलनाचे पाऊल संघटनेने उचलले आहे.
शासनाच्या विविध योजना ग्रामस्तरावर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी उमेद अभियान महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. त्याचबरोबर शासनाचे विविध उपक्रम यशस्वी करण्यामध्ये उमेदच्या महिलांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. या सर्वाचा विचार करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांनी उमेद अभियानाची स्वतंत्र आस्थापना तयार करावी व ग्रामविकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या महिलांना व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, ही संघटनेच्यावतीने मागणी केली आहे. त्यासाठी आता कामबंद आंदोलन सुरु केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com