बेंचेस भ्रष्‍टाचार विरोधात कणकवलीत मोर्चा

बेंचेस भ्रष्‍टाचार विरोधात कणकवलीत मोर्चा
Published on

16028

बेंचेस भ्रष्‍टाचार विरोधात कणकवलीत मोर्चा
सामाजिक एकता मंचचे आयोजन : प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन
कणकवली, ता. ३ : ग्रामपंचायतींना पुरविण्यात आलेल्या बेंचेसमध्ये भ्रष्‍टाचार झाला आहे. त्‍याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी या मागणीसाठी आज कणकवलीत मोर्चा काढण्यात आला. त्‍यानंतर पाच तास प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू होते. अखेर बेंचेस या भ्रष्‍टाचाराबाबत ७ ऑक्‍टोबरला सिंधुदुर्ग नगरी येथे समाजकल्‍याण आयुक्‍त, तीनही तालुक्‍यांचे गटविकास अधिकारी यांची बैठक लावून पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी ग्‍वाही प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिली. यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला.
कणकवली विधानसभा मतदारसंघातील कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तीन तालुक्‍यातील अनुसूचित जाती - जमातींच्या वस्त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत बेंचेस पुरविण्यात आल्‍या आहेत. मात्र या बेंचेसमध्ये समाजकल्‍याण विभागाने मोठा भ्रष्‍टाचार केला आहे. या अपहाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. दोषींवर गुन्हे दाखल व्हावेत. या मागणीसाठी सामाजिक एकता मंच तर्फे कणकवली शहरातील बुद्धविहार ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात संदीप कदम, अंकुश कदम, संजय कदम, दिपक कदम, हेमंतकुमार तांबे, सी. आर. चव्हाण, विठ्ठल चव्हाण, रवींद्र पवार, विद्याधर कदम, प्रकाश वाघेरकर, प्रविण तांबे, सिध्दार्थ तांबे, सुभाष जाधव, भाई जाधव, अजय जाधव, दिपक कदम, कविता जाधव, बाळा जाधव, रविंद्र तांबे, स्वप्नील कदम, संजय शिवराम कदम, महेश पेडणेकर, आनंद तांबे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

चौकट
आंदोलनकांच्या मागण्या अशा -
* निकृष्‍ट बेंचेस खरेदी प्रकरणी अपहाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.
* बेंचेस खरेदीत आर्थिक घोटाळयाला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.
* अनुसूचित जाती-जमातीच्या वस्त्यांच्या विकास कामांसाठी झालेल्या खर्चित निधीचा अहवाल द्यावा.
* अनुसूचित जाती-जमातीच्या वस्त्यांऐवजी मनमानी पध्दतीने बेंचेसचे वितरण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com