पान एक-सिंधुदुर्गात परतीचा पाऊस लांबणार

पान एक-सिंधुदुर्गात परतीचा पाऊस लांबणार
Published on

सिंधुदुर्गात परतीचा पाऊस लांबणार
ऑक्टोबर अखरेपर्यत सरी; भात पीक कापणीत व्यत्यय
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ३ ः मॉन्सूनच्या परतीचा जिल्ह्यातील प्रवास लांबणार असून, ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे भात पीक कापणीत व्यत्यय येणार आहे. गुरुवारी जिल्ह्याच्या काही भागात विजांच्या लखलखाटासह पावसाच्या सरी बरसल्या. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी लोकांचा हिरमोड झाला आहे.

जिल्ह्यात ऑक्टोबर हिटच्या झळा बसू लागल्या आहेत. सकाळच्या सत्रात कडक ऊन आणि सायंकाळी विजांच्या लखलखाटासह पाऊस असे चित्र होते. मंगळवारी दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. तापमानदेखील ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे उन्हाचे चटके जिल्हावासीयांनी अनुभवले. गुरुवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी एकपासून जिल्ह्यातील वैभववाडी आणि कणकवली तालुक्याच्या काही भागात सरी बरसल्या. वैभववाडीत जोरदार सरी पडल्या.
एकीकडे उन्हाचे चटके बसत असताना गुरुवारी हवामान विभागाने शेतकऱ्यांची चिंता वाढविणारा अंदाज दिला आहे. सिंधुदुर्गातून साधारणपणे १० ते १२ ऑक्टोबर या कालावधीत परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. परंतु, यावर्षी मॉन्सूनचा परतीचा प्रवास काहीसा लांबणार आहे. याशिवाय मान्सून्नोत्तर पावसाचे दिवसदेखील वाढण्याचे संकेत आहेत. त्यामुळे यावर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत पावसाच्या सरी जिल्ह्यात पडणार आहेत. प्रतिदिन ५ ते १० मिलिमीटर पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
जिल्ह्यातील ४० ते ४५ टक्के भात पीक परिपक्व झाली आहेत. त्यातील १० टक्के पिकांची कापणी तातडीने न झाल्यास त्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस झाल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

चौकट
सकाळच्या सत्रात भातकापणीचा सल्ला
जिल्ह्यात पावसाचे वातावरण असून पुढील काही दिवस पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील भात पीक कापणीला आलेले आहे. शेतकऱ्यांनी जेवढ्या पिकांची झोडणी करणे शक्य आहे, तेवढ्याच पिकांची सकाळच्या सत्रात कापणी करावी. दुपारनंतर शेतीची कामे करू नये, असे आवाहन ग्रामीण कृषी मौसम सेवा (मुळदे) तर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com