ओटवणे-चराठा रस्त्याची ग्रामस्थांनी केली डागडुजी

ओटवणे-चराठा रस्त्याची ग्रामस्थांनी केली डागडुजी

Published on

16243

ओटवणे-चराठा रस्त्याची
ग्रामस्थांनी केली डागडुजी

सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. ४ः चराठा-ओटवणे मुख्य मार्गादरम्यान धोकादायक वळणावरील रस्त्यावर पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती आल्यामुळे हे वळण वाहतुकीस धोकादायक बनले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर ओटवणे मांडवफातरवाडी येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेत या वळणावरील माती काढून रस्ता वाहतूक सुरळीत केला. या वळणावरील रस्त्यावर पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती आल्यामुळे दुचाकी घसरून अनेक अपघात झाले. सार्वजनिक बांधकामाचे अनेक वेळा लक्ष वेधूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर मांडवफातरवाडी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन रस्त्यावर आलेली ही माती दूर केली. या श्रमदानात प्रकाश पनासे, मिलिंद म्हापसेकर, अनिल रेडकर, अवधूत भगत, समीर गोडकर, उमेश परब, विजय पनासे, सुभाष राणे, गजानन तावडे, दिलीप वारंग, दिलीप वारंग यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com