ज्येष्ठांनी छंदासह मनोरंजन, सेवा अवलंबावी

ज्येष्ठांनी छंदासह मनोरंजन, सेवा अवलंबावी

Published on

16050

ज्येष्ठांनी छंदासह मनोरंजन, सेवा अवलंबावी
प्रदीप परब-मिराशीः आचऱ्यात जेष्ठ नागरिक दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ४ः ज्येष्ठांनी छंद, मनोरंजन, सेवा आणि कार्यमग्नता अवलंबावी. ज्या समाजाने आपणास लहानाचे मोठे केले त्या समाजाच्या ऋणात कायम रहावे‌. आयुष्यभर नारद मुनींची कल्पकता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अभ्यासू वृत्ती आणि संत तुकोबांची ईश्वरसेवा यांचे अनुकरण करावे. त्यामुळे आपले जीवन सुखी आणि आनंदी होईल, असे उद्गार इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचे अध्यक्ष आणि धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबईचे कार्याध्यक्ष प्रदीप परब-मिराशी यांनी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशी महामेळाव्यात मार्गदर्शन करताना काढले.
जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त येथील रामेश्वर मंदिर सभागृहात कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या सोबत ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी, जेष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर, बाबाजी भिसळे, लक्ष्मणराव आचरेकर, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, देवस्थान खजिनदार कपिल गुरव, जेष्ठ नागरिक संघाचे जे. एम. फर्नांडीस, श्रीमती मनाली फाटक उपस्थित होते. देवस्थान नुतन अध्यक्ष परब-मिराशी यांचा अशोक कांबळी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ प्रदान करून सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्रुती गोगटे, स्मिता हडकर, नामदेव आडवलकर, सुहास हडकर या ज्येष्ठांचे वाढदिवसानिमित्त, श्री व सौ. सुरेश हडकर आणि अनिल पारकर या दाम्पत्यांचा तसेच रमाकांत शेट्ये, शिवराम शेटये, दीपक आचरेकर, चंद्रकांत साळकर, राजश्री गोसावी यांचा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्यावतीने भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरेचे संस्थापक सदस्य लक्ष्मणराव आचरेकर यांना श्री. परब-मिराशी यांच्या हस्ते जेष्ठ सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com