मातृत्व आधार फाउंडेशनमार्फत मालवणात विद्यार्थ्यांना दप्तर

मातृत्व आधार फाउंडेशनमार्फत
मालवणात विद्यार्थ्यांना दप्तर
Published on

१६०६१

मातृत्व आधार फाउंडेशनमार्फत
मालवणात विद्यार्थ्यांना दप्तर
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ : येथील भंडारी ए. सो. हायस्कूल येथे मातृत्व आधार फाउंडेशनच्यावतीने दप्तर वाटपाचा कार्यक्रम फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी लु़डबे यांनी, पाच वर्षांपूर्वी समाजहिताच्या दृष्टिकोनातून स्थापन झालेल्या मातृत्व आधार फाउंडेशनने निरपेक्ष बुद्धीने सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक उपक्रम राबवितानाच गोरगरीब, दीनदलितांचे अश्रू पुसण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला. शिक्षण क्षेत्रात गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविले. यापुढेही सामाजिक जाणिवेतून मातृत्व आधार फाउंडेशन अशाच पद्धतीने उपक्रम राबवेल, असे प्रतिपादन केले.
यावेळी व्यासपीठावर मातृत्व फाउंडेशनचे अध्यक्ष महेश कांदळगावकर, बिर्ला कंपनीचे सेवानिवृत्त सुपरवायझर रमाकांत पाटकर, सुहासिनी पाटकर, मुख्याध्यापक एच. बी. तिवले, फाउंडेशनचे संचालक दादा वेंगुर्लेकर, सोनाली पाटकर, टोपीवाला हायस्कूलच्या शिक्षिका ज्योती तोरसकर, ऋत्विक सामंत, किसन मांजरेकर, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक तिवले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी पाटकर यांच्या आर्थिक योगदानातून विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. कांदळगावकर, वेंगुर्लेकर यांनी मनोगत व्यक्त केले. पर्यवेक्षक बनसोडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com