फळबाग लागवडीवर सहा वर्षात 12 कोटी खर्ची
जिल्ह्यात फळबाग लागवडीवर १२ कोटींचा खर्च
‘मनरेगा’ योजना ; सहा वर्षातील स्थिती, शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गेल्या सहा वर्षात राबवण्यात आलेल्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी सुमारे १२ कोटीपेक्षा जास्त निधी खर्ची पडला आहे. यंदा ही योजना प्राधान्याने राबवण्यात येणार असून, योजनेला मिळालेल्या प्रतिसादामुळे योजनेच्या उद्दिष्टात वाढ करण्यात आली आहे.
कोरोना कालावधीत टाळेबंदीमुळे मुंबईकर चाकरमानी गावाकडे परतल्यामुळे त्या कालावधीत मोठ्या प्रमाणात फळलागवडीला चालना मिळाली होती. आंबा, काजू या हमखास उत्पन्न देणाऱ्या फळबागांकडील कल दिवसेंदिवस वाढत आहे. आंब्यापेक्षा काजू लागवडीवर अधिक भर आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मनरेगा योजनेतील फळबाग लागवडी योजनेचा लाभ घेत आहे. रत्नागिरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्या माध्यमतानू शेतीपूरक रोजगारही मिळाला आहे. शासनाकडून थेट बँक खात्यात मजुरी जमा होत असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात योजनेतील लागवडीचे प्रस्ताव प्रगतीपथवार आहेत. मजुरीसाठी या योजनेत अडीच कोटी निधीची तरतूद करण्यात आली होती. गेल्या सहा वर्षात तालुक्यातील दीडशेहून अधिक गावांमधील २ हजार २८५.७५ हेक्टर क्षेत्रात आंबा, काजू, नारळ, चिकू, साग आदी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली आहे. त्यासाठी ३ हजार ५२८ मजुरांना ११ कोटी ८४ लाख १ हजार ८७९ रुपयांचा शासनाचा निधी खर्ची पडला आहे. भविष्यात या योजनेंतर्गत वाढ होत राहणार आहे.
-----
जिल्ह्यातील फळ लागवडीची स्थिती...
*वर्ष* क्षेत्र (हेक्टर)* मजूर* निधी खर्ची (रुपये)
२०१८-१९* ४३४.८०* ६१९* १ कोटी ८० लाख ४६ हजार २६
२०१९-२०* ५६१.९५* ७४९* २ लाख २५ हजार ३३९
२०२०-२१* ३८१.४५* ६२९* १ कोटी ७२ लाख ७४५
२०२१-२२* ३५६.२५* ५९५* २ कोटी ८४ लाख ८७ हजार २३८
२०२२-२३* २६०.७०* ४२४* १ कोटी ६९ लाख ८ हजार ८३६
२०२३-२४* २९०.६०* ५१२* १ कोटी ४२ लाख ३३ हजार ६९५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

