

16160
कास येथील माऊली मंदिरात
विविध कार्यक्रमांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ४ः कास येथील श्रीदेवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त दररोज सकाळी देवीची पूजाअर्चा, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होणार आहे.
यानिमित्त उद्या (ता.५) सायंकाळी ६ वाजता देऊळवाडी महिलांची फुगडी, रात्री ८ वाजता ऋचा संजय पिळणकर (माणगाव) यांचे कीर्तन, रात्री ९ वाजता मुळपुरुष प्रासादिक भजन मंडळ, वेंगुर्ले यांचे वारकरी भजन होणार आहे. रविवारी (ता.६) सकाळी ९ वाजता मोफत आरोग्य शिबीर, सायंकाळी ६ वाजता नवरंग महिला फुगडी ग्रुपचा फुगडी कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता संगीत रजनी संध्या हा संगीत कार्यक्रम, रात्री ९ वाजता मातोड पेंडूर येथील वारकरी भजन, रात्री १० वाजता वावळेश्वर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. सोमवारी (ता.७) सायंकाळी ६ वाजता जय भवानी फुगडी ग्रुप मुंडासबागवाडी यांचा फुगडी कार्यक्रम, रात्री ९ वाजता कलेश्वर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल. मंगळवारी (ता. ८) सायंकाळी ६ वाजता मळीवाडी महिलांची फुगडी, ७:३० वाजता कास ग्रामस्थांचे भजन, रात्री ८ वाजता श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ कुडाळ यांचा फुगडी कार्यक्रम, रात्री ९ वाजता कथ्थक नृत्य विशारद मृणाल सावंत यांचे नृत्य सादरीकरण होईल. बुधवारी (ता.९) सायंकाळी ६ वाजता काळभैरव महिला फुगडी ग्रुप राणेवाडी यांची फुगडी, ७ वाजता कास ग्रामस्थांचे भजन, रात्री ८ वाजता श्री देव ब्राह्मण प्रसादिक भजन मंडळ रेडी यांचे भजन, रात्री ९ वाजता प्रसिद्ध निवेदक बादल चौधरी यांच्या समवेत ''खेळ पैठणीचा'' हा महिलांसाठी कार्यक्रम होईल. गुरुवारी (ता.१०) सायंकाळी ६ वाजता महालक्ष्मी फुगडी ग्रुप पंडितवाडी यांची फुगडी, सायंकाळी ७ वाजता कास ग्रामस्थांचे भजन, रात्री १० वाजता चेंदवणकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल. पावणेर उत्सवानिमित्त १४ ला रात्री ९ वाजता जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ आरोस यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होईल. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कास ग्रामस्थांतर्फे केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.