

ओरोसमधील ''इको हॉटेल्स''चे
११ ला होणार उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ः इको हॉटेल्स अँड रिझॉर्टस् लिमिटेड ही पर्यावरणपूरक (ग्रीन) आतिथ्यशीलतेच्या क्षेत्रातील आद्य कंपनी ओरोसमधील आतिथ्यशीलता क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. ९० हून अधिक खोल्या असलेले तीन नवीन हॉटेल्स सुरू करण्याची कंपनीची महत्त्वाकांक्षी योजना असून इको एक्स्प्रेसया बुटीक हॉटेलचे उद्घाटन शुक्रवारी (ता. ११) होणार आहे.
उत्तम रचनेच्या खोल्या, वैविध्यपूर्ण मल्टि-क्युझिन रेस्टोरंट, बैंक्वेट हॉल आणि तात्पुरत्या डान्स फ्लोअरसह रूफटॉप रेस्टोरंट यांच्या माध्यमातून हे हॉटेल पाहुण्यांना रोमांचक अनुभव देणार आहे. शहरातील तरुणाईला, विशेषतः सिंधुदुर्गवासी तरुणांना, आकर्षित करणारे एक अत्याधुनिक स्थळ पुरवण्याच्या दृष्टीने रूफटॉप कायापालटासाठी सज्ज आहे. इकोएक्स्प्रेस ज्या सिद्धी कॉम्प्लेक्समध्ये आहे, तेथे ९० आसनी डोम सिनेमागृह होणार आहे. त्याचप्रमाणे'' श्री शेखर सावंत'' यांचे उत्कृष्ट गारमेंट शोरूमही येथे उघडण्याची योजना आहे. त्यामुळे या संकुलाचे आकर्षण वाढणार आहे. शिवाय या संकुलात पार्किंगसाठी मुबलक जागा असल्याने येणाऱ्या लोकांसाठी ते सोयीस्कर ठरणार आहे.
या प्रकल्पात महत्वाची भूमिका बजावणारे सिद्धी कॉम्प्लेक्सचे मालक चंद्रशेखर सावंत म्हणाले, "सिद्धी कॉम्प्लेक्सला ओरोसच्या कायापालटाचा आधारस्तंभ म्हणून आकार घेताना बघणे अत्यंत समाधानाचे आहे. आमच्या संकुलात इकोएक्स्प्रेसची भर घातल्यानंतर या आतिथ्यशीलतेला पूरक ठरेल असे उच्च दर्जाचे गारमेंट शोरूम उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य आमच्यापुढे आहे. सिंधुदुर्गवासीयांच्या फॅशनविषयक गरजा हे शोरूम पूर्ण करेल."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.