जिल्हास्तर युवा महोत्सवाचे 21 नोव्हेंबरला आयोजन

जिल्हास्तर युवा महोत्सवाचे 21 नोव्हेंबरला आयोजन
Published on

युवा महोत्सव
२१ नोव्हेंबरला
सिंधुदुर्गनगरीः जिल्हास्तर युवा महोत्सव २१ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता जिल्हा नियोजन समिती हॉल (नवीन) सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली. युवकांचा सर्वागिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकाच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर आयोजन करून राज्याचा प्रातिनिधिक चमु राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पाठविण्यात येतो. यावर्षी ''विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना'' (इनोव्हेशन इन सायन्स अँड टेक्नोलोजी) ही संकल्पना दिलेली आहे. यावर आधारित जिल्हा युवा महोत्सवात विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या महोत्सवामध्ये सांस्कृतिक - समुह लोकनृत्य, वैयक्तिक सोलो लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक सोलो लोकगीत, कौशल्य विकास-कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी) फोटोग्राफी. संकल्पना आधारित स्पर्धा- महाराष्ट्र राज्यासाठी, तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान. युवा कृती- हस्तकला, वस्रोद्योग, अॅगो प्रोडक्ट या स्पर्धात्मक बाबीचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १५ ते २९ वयोगटातील युवक युवतींना सहभागी होता येईल. इच्छुकांनी आपली नाव नोंदणी स्पर्धापूर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे करावी तसेच सहभाग होण्यासाठी गुगल लिंकवर २० नोव्हेंबरपर्यंत भरण्यात यावे. जिल्ह्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयातील व कृषी महाविद्यालय, इंजिनिअरींग कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जास्तीत जास्त युवक युवती संघांनी, महिला मंडळ यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शिरस यांनी केले आहे.
----
ई-आर १ विवरणपत्र
भरण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरीः जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाचे मनुष्यबळाचे सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीचे ई आर १ हे विवरणपत्र ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे. सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा) कायदा १९५९ अन्वये कलम ५ मधील तरतुदीनुसार शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनेत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माहितीचे तिमाही विवरणपत्र ई आर १ प्रत्येक तिमाही संपल्यावर ३० दिवसाचे आत सादर करणे आस्थापनेस बंधनकारक आहे. त्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने भरावे. ज्या उद्योजक, आस्थापना यांना ऑनलाईनव्दारे विवरणपत्र भरण्यास अडचणी येत असतील तर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
----------------------

माजी सैनिक, पाल्यांना
डेटा अद्यावतचे आवाहन
सिंधुदुर्गनगरीः जिल्ह्यातील सर्व युध्द विधवा, सेवारत दिवंगत सैनिकांच्या पत्नी, युध्द काळात व युध्द नसताना सैनिकी सेवेत मृत झालेल्या किंवा अपंगत्व येऊन त्यामुळे नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी सैनिकांना व त्यांच्या पाल्यांना शासकीय पद भरतीकरीता डेटा अद्यावत करावयाचा आहे. त्याअनुषंगाने संबंधित स्वत: आपले व आपल्या कुटुंबातील अवलंबितांचा तपशिल मुळ कागदपत्रासह (सोबत सर्व कागदपत्रांची छायांकीत प्रतीसह) जिल्हा सैनिक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे १८ ऑक्टोबरपुर्वी कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com