चिपळुणात देशी भाज्यांची विक्री

चिपळुणात देशी भाज्यांची विक्री

Published on

-rat३p२६.jpg-
२४N१५९६१
चिपळूण ः इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसरात गावठी भाज्यांची विक्री करताना महिला.
-----------

चिपळूणमध्ये स्थानिक भाज्यांच्या विक्रीत वाढ

आरोग्यास गुणकारी; सणासुदीच्या काळात वाढली मागणी, महिलांना रोजगार

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ : चिपळूण शहरातील बाजारपेठेमध्ये स्थानिक (गावठी) भाज्यांची आवक वाढली आहे. या भाज्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. ग्रामीण भागातील महिला गावठी भाज्यांची विक्री करत असल्याने त्यांना रोजगार मिळाला आहे.
तालुक्यातील कामथे, मिरजोळी, जुवाड, गोवळकोट, शिरळ, कळवंडे या गावांमध्ये गावठी भाज्यांचे पीक घेतले जाते. यांसह इतरही ठिकाणी गवार, भेंडी, वांगी, टोमॅटो, काकडी, कारली, शिराले, दुधी, अळूची पाने, माठाची भाजी आदी गावठी भाज्या ग्रामीण भागातील महिलांकडून चिपळूण शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्या जात आहेत. गावठी भाजी स्वस्त आणि मस्त यासह आरोग्यास गुणकारी असल्याने नागरिकांकडून या भाज्या खरेदी केल्या जात आहेत. त्यामुळे या महिलांचा उरदनिर्वाह होत आहे. काही महिला टोपलीमध्ये या भाज्या घेऊन शहरात घरोघरी फिरतात आणि भाज्यांची विक्री करतात तर काही महिला इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसर, चिंचनाका परिसर, मध्यवर्ती एसटी बसस्थानक परिसर, जुने बसस्थानक परिसर, गुहागरनाका, भेंडीनाका आदी ठिकाणी रस्त्यालगत बसून गावठी भाज्यांची विक्री करतात. पानगल्लीमध्येही स्थानिक भाज्यांची विक्री होते.
-----
किलोमागे भाव
भेंडी - ४० रुपये किलो
कारली - ४०
गवार - ६०
काकडी - ४०
वांगी - ६०
दुधी - ४०
माठाची भाजी जुडी - २०
अळूची पाने - २०
-------------
कोट
चिपळूण शहराच्या आजूबाजूच्या डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर गावठी भाजी लावली जाते. ही भाजी स्वस्त, मस्त आणि खायला चविष्ट असून सध्या उपवासाचे दिवस सुरू आहेत. गावठी भाज्यांना मागणीसुद्धा जास्त आहे. या भाज्यांची विक्री करून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आम्ही करत आहोत.
- पार्वती पवार, भाजीविक्रेत्या, कळवंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com