भंडारी फाउंडेशनतर्फे मत्स्यपदार्थ पाककला स्पर्धा
रत्नागिरीत मत्स्यपदार्थ पाककला स्पर्धा
भंडारी फाउंडेशनतर्फे १६ला आयोजन; विजेत्यांचा होणार गौरव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : येथील भंडारी फाउंडेशनतर्फे येत्या १६ ऑक्टोबरला दुपारी २ ते संध्याकाळी ७ या वेळेत श्री भैरव मंगल कार्यालयात जागतिक अन्नदिवस सोहळा आयोजित केला आहे. त्यात प्रथम सत्रात मत्स्यपदार्थ पाककला स्पर्धा, दुसऱ्या सत्रात व्याख्यानमाला आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम होईल.
मत्स्यपदार्थ पाककला स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील भंडारी समाजातील स्त्री आणि पुरुष सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेअंतर्गत प्रत्येक स्पर्धक एकच पदार्थ स्पर्धेसाठी प्रदर्शित करू शकतो. जो मत्स्यपदार्थ स्पर्धेसाठी प्रदर्शित करण्यात येणार आहे त्या पदार्थाच्या कृतीमध्ये मासे अथवा कवचधारी जलचराचा समावेश असणे बंधनकारक राहील. प्रथम विजेत्या स्पर्धकास ३ हजार रु., द्वितीय २ हजार रु., तृतीय १ हजार रु. आणि उत्तेजनार्थ विजेत्या स्पर्धकाला ५०० रुपयांचे बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. मत्स्यपदार्थ पाककला स्पर्धेत भाग घेण्यासाठी नाममात्र नोंदणी शुल्क आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी रूपेंद्र शिवलकर, विनायक भाटकर, पराग भाटकर, सुहास धामणस्कर, सुरेश शेटये, गजानन मयेकर, दर्शन रांगणेकर, नेहली नागवेकर, नंदकुमार महाकाळ, अमोल आरेकर, विनया भाटकर, मंगेश शिरधनकर यांना संपर्क साधावा. दुसऱ्या सत्रामध्ये भंडारी फाउंडेशनच्या स्थापना आणि उद्दिष्टाविषयीची माहिती दिली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

