भगवती देवीला चांदीचा मुखवटा
-rat३p३३.jpg-
24N16201
लांजा ः विकास शेट्ये यांनी श्री देवी भगवतीसाठी बनवलेला चांदीचा मुखवटा.
--------
भगवती देवीला चांदीचा मुखवटा
लांजा, ता. ४ ः शहरातील वैश्य बांधवांचे आराध्य दैवत आणि शेट्ये घराण्याची कुलस्वामिनी असलेल्या श्री देवी भगवतीला यावर्षी देवीचे भक्त विकास शेट्ये यांनी दोन किलोचा चांदीचा मुखवटा स्वखर्चाने बनवला आहे. या मुखवट्याची गुरूवारी सकाळी मिरवणूक काढण्यात आली.
वैश्य समाजातील (कै.) विष्णू भाई शेट्ये यांच्या प्रेरणेतून ४० वर्षांपूर्वी श्री देवी भगवतीच्या नवरात्रोत्सवाला सुरवात झाली. सद्यःस्थितीत हा उत्सव अतिशय दिमाखात साजरा केला जातो. श्री देवी भगवतीचे २७ मे १९८४ ला मंदिर बांधून तिची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शेट्ये यांनी गतवर्षी २ किलो चांदीचे हात, पाय व हार बनवले होते. यावर्षी त्यांनी वृंदा विकास शेट्ये यांना मिळालेल्या प्रेरणेमुळे चांदीचा २ किलोचा मुखवटा बनवला आहे. देवीच्या या चांदीच्या मुखवट्याची गुरूवारी सकाळी ८ वा. वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

