जाखडी स्पर्धेत मनीष शिगवण यांना प्रथम क्रमांक

जाखडी स्पर्धेत मनीष शिगवण यांना प्रथम क्रमांक

Published on

- rat४p५.jpg -
२४N१६१३८
जाखडी स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी, मान्यवर परीक्षक आणि शिक्षक.

जाखडी स्पर्धेत मनीष शिगवण यांना प्रथम क्रमांक

आठल्ये-सप्रे महाविद्यालय ; नऊ संघांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. ४ ः आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित जाखडी स्पर्धेत १२वी वाणिज्य-ब शाखेतील मनीष शिगवण आणि सहकाऱ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
प्राचीन कोकणी लोककलांचे जतन व्हावे या उद्देशाने जाखडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नऊ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्‍घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी केले. त्यांनी जाखडी या नृत्यासोबत लोकांची व लोकसंस्कृतीची नाळ कशी जोडली आहे, याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी जाखडीच्या निमित्ताने कलागुणांना वाव द्यावा, असेही सांगितले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून संगमेश्वर तालुका ‘कलगीतुरा मंडळ’ अध्यक्ष शाहीर शांताराम मालप, शाहीर बापू चव्हाण, सचिव शाहीर आप्पा शिंदे, खजिनदार शाहीर मनोहर सुकम, सदस्य शाहीर गजानन सुकम आणि शाहीर अमित डांगे, शाहीर सुरेश खाके यांनी काम पाहिले.
स्पर्धक विद्यार्थ्यांनी स्त्री भ्रूणहत्या, व्यसनाधीनता, स्त्रियांवरील अत्याचार, पर्यावरण जागृती व संवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन याबाबत जनजागृती व्हावी यासाठी जाखडी नृत्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. संदीप मुळ्ये, सदस्य प्रा. सुनील वैद्य, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. संचिता चाळके आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले. स्पर्धेचा निकाल असा ः मनीष शिगवण आणि सहकारी (प्रथम, १२वी वाणिज्य ब), सई नर आणि सहकारी (द्वितीय, १२वी वाणिज्य), अन्वी प्रसादे आणि सहकारी (तृतीय, ११वी वाणिज्य), आयुष जाधव आणि सहकारी (११वी कला), हर्ष घाटकर आणि सहकारी (दोघांना उत्तेजनार्थ, १२वी संयुक्त).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com