ज्येष्ठांनी नैराश्य टाळावे
- rat४p१.jpg-
२४N१६१३३
रत्नागिरी : कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघात बोलताना डॉ. शाश्वत शेरे.
जीवनातील बदलांना सकारात्मकतेने स्विकारा
डॉ. शाश्वत शेरे ः कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघात व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : स्मृतीभ्रंश हा ६५ वर्षावरील ज्येष्ठांना मानसिक आजार होतो. तो टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी नियमित व्यायाम, योगाभ्यास, प्राणायाम, ध्यानधारणा, संतुलित आहार, छंदांची जोपासना करावी. सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग वाढवावा आणि नैराश्य, चिंता विसरून जीवनातील बदलांना सकारात्मक कृतीने सामोरे जावे, असे आवाहन मनोविकारतज्ज्ञ डॉ. शाश्वत शेरे यांनी कुवारबाव ज्येष्ठ नागरिक दिनी करताना केले.
कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघात ज्येष्ठ नागरिक दिन संघाचे अध्यक्ष मारूती अंबरे यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रमाने उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. डॉ. शेरे यांनी ज्येष्ठांमधील स्मृतिभ्रंश या मानसिक आजाराविषयी माहिती दिली. वेगाने बदलणारी सामाजिक परिस्थिती, व्यसनाधीनता, मेंदूचे आजार कारणीभूत ठरत असल्याने त्यावर मात करण्यासाठी भक्ती, कर्म, ज्ञान या आध्यात्मिक शोधाचे मार्ग स्वीकारून वर्तमानातील क्षणांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. त्यानंतर ज्येष्ठांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे शंका समाधान केले. श्यामसुंदर सावंतदेसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भारतातही आता ज्येष्ठांसाठी नवे ज्येष्ठ नागरिक धोरण अंमलात आणून ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी आर्थिक तरतुदीसह नव्या योजना राबवण्यात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या वेळी सप्टेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचे सत्कार करण्यात आले. या वेळी संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र कदम, प्रकाशराव शिंदे, प्रसिद्धीप्रमुख प्रभाकर कासेकर आदींनी चर्चेत भाग घेतला. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाविषयी मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र शासनानेही राज्यासाठी ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापन केल्याबद्दल शासनाला धन्यवाद दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

