विद्यार्थ्यांनी केली मांडवी किनाऱ्याची सफाई

विद्यार्थ्यांनी केली मांडवी किनाऱ्याची सफाई

Published on

- rat४p२.jpg-
P२४N१६१३५
रत्नागिरी : मांडवी येथे स्वच्छता करणारे देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी.

विद्यार्थ्यांनी मांडवी किनाऱ्याची केली सफाई

कीर वरिष्ठ महाविद्यालय ; स्वच्छतेचा संस्कार रूजवण्यासाठी उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात स्वच्छता ही सेवा पंधरवडा या उपक्रमाची सांगता स्वच्छ सागर सुरक्षित सागर या उपक्रमाने करण्यात आली. यामध्ये रत्नागिरी शहरातील मांडवी किनारा विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला. या किनाऱ्यावर दररोज पर्यटकांची गर्दी असते. महाविद्यालयाच्या उपक्रमामुळे हा किनारा स्वच्छ आणि सुंदर झाला आहे.
स्वच्छता ही सेवा अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये संपूर्ण भारतामध्ये राबवण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून स्वच्छता ही सेवा या उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छ्ता रॅली महाविद्यालयापासून मांडवी किनारपट्टीपर्यंत काढण्यात आली. महाविद्यालयातील एनएसएस स्वयंसेवकांनी मांडवी किनारपट्टीची स्वच्छता केली व या उपक्रमातून स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता हा संदेश दिला. स्वच्छतेचा संस्कार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये रूजवण्यासाठी स्वच्छता ही सेवा पंधवडा साजरा करण्यात आला. यात महाविद्यालय परिसर स्वच्छता, कागदी पिशव्या तयार करून त्याचे वितरण, स्वच्छताविषयक घरोघरी जनजागृती, बसस्थानक स्वच्छता, वारसास्थळाची स्वच्छता, रत्नदुर्ग किल्ला, मांडवी किनारपट्टी स्वच्छता व स्वच्छता रॅली हे उपक्रम राबवण्यात आले.
या उपक्रमात महाविद्यालयातील एनएसएस विभागाचे सर्व स्वयंसेवक सहभागी झाले. प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्य वसुंधरा जाधव, एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. ऋतुजा भोवड व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी मिथिला वाडेकर, रत्नागिरी नगर परिषद मुख्याधिकारी तुषार बाबर व नगर परिषद उपमुख्याधिकारी इंद्रनील चाळके, शहर स्वच्छ्ता निरीक्षक संदेश कांबळे, हर्षवर्धन काटकर, प्रणित जाधव, नरेंद्र बनये, दिव्य स्वप्न फाउंडेशनचे ओमकार जाधव, अमर लोखंडे व इतर अधिकारी तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
-----
स्वतःहून श्रमदानात सहभाग

स्वच्छता ही सेवा ही मोहीम सामुदायिक जबाबदारीची भावना वाढीस लावण्याच्या उद्देशाने स्वच्छतेविषयक जनजागृती करण्यासाठी आणि स्वच्छतेचा संस्कार जनमानसात रूजवण्यासाठी महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी स्वतःहून श्रमदानात सक्रिय सहभाग घेऊन आपले कर्तव्य पार पाडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com