महात्मा गांधीचे गुण अंगीकारा
- rat३p६.jpg-
P२४N१५८२५
सावर्डे : महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करताना सचिव महेश महाडिक, प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर आदी.
महात्मा गांधी यांचे गुण अंगीकारा
राजेंद्र वारे ः निकम विद्यालयात कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ४ : गांधीजींचे तत्त्व म्हणजे देशाच्या विकासाचा पाया आहे. ‘जय जवान जय किसान’ हा नारा देऊन स्वकर्तृत्वाने सर्वांना प्रभावित करण्याचे काम लालबहादूर शास्त्री यांनी केले. त्यांचा पंतप्रधान काळ म्हणजे सुवर्णकाळ म्हणून आजही सर्वांच्या स्मरणात आहे. या महान व्यक्तींनी वाचनकौशल्य विकसित केले होते. त्यांच्या या गुणांचा अंगीकार विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी या वेळी केले.
येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी सचिव महेश महाडिक, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. युवराज रसाळ, स्नेहा जाधव, कोमल सावंत, आर्या जाधव व सिद्धी इंगळे या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याची माहिती दिली. निवेदन सुधीर कदम यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

