

व्हिडीओ निर्मिती स्पर्धेचा निकाल जाहीर
शिक्षकांसाठी आयोजन ः जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ४ ः राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेमार्फत घेण्यात आलेल्या ‘शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३’ चा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातील शिक्षकांमध्ये तंत्रस्नेही चळवळ निर्माण व्हावी, शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ही साहित्य निर्मितीची चळवळ उभी राहावी, यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, डीएड शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या शैक्षणिक संशोधन परिषदेतर्फे दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे आयोजन केले होते.
जिल्हास्तरीय निकालात पहिली व दुसरीच्या भाषा या विषयाचा अनुक्रमे निकाल असा ः अविनाश औटे (शाळा न्हीवे कांदळगांव), गणेश नाईक (जिल्हा परिषद शाळा पेंडूर खरारे), सरिता परब (जिल्हा परिषद कुडाळ पडतेवाडी). गणित ः गणेश नाईक (जिल्हा परिषद शाळा पेंडूर खरारे), अविनाश औटे (शाळा न्हीवे कांदळगांव), सरिता परब (जिल्हा परिषद कुडाळ पडतेवाडी). इंग्रजी ः शितल देवरकर (जिल्हा परिषद शाळा रामेश्वर), दिपक डवर (जिल्हा परिषद शाळा सौंदाळे बाऊल), अविनाश औटे (जिल्हा परिषद शाळा न्हीवे कांदळगांव). तिसरी व पाचवी ः भाषा-अविनाश औटे (जिल्हा परिषद शाळा न्हीवे कांदळगांव), कृष्णा गायडे (जिल्हा परिषद शाळा कुडाळ पडतेवाडी), निवेदिता चव्हाण (जिल्हा परिषद शाळा पेंडर नाईकवाडी). गणित ः गणेश नाईक (जिल्हा परिषद शाळा खरारे), दीपक जाधव (ओझर विद्यामंदिर कांदळगाव), पुनम खोराटे (जिल्हा परिषद शाळा बोडदे). इंग्रजी ः पुनम खोराटे (जिल्हा परिषद शाळा बोडदे), शीतल देवलकर (जिल्हा परिषद शाळा रामेश्वर), अविनाश औटे (जिल्हा परिषद शाळा न्हीवे कांदळगांव). परिसर अभ्यास ः सरीता परब (जिल्हा परिषद शाळा कुडाळ पडतेवाडी), गणेश नाईक (जिल्हा परिषद शाळा पेंडुर खरारे), स्मिता नाईक (जिल्हा परिषद शाळा न्हावेली क्रमांक १). सहावी ते आठवी ः भाषा-अविनाश औटे (जिल्हा परिषद शाळा न्हीवे कांदळगांव), ऋतुजा जंगले (जिल्हा परिषद शाळा बारगाव क्रमांक १), रिया सांगेलकर (जिल्हा परिषद शिरशिंगे क्रमांक १). गणित ः दीपक डवर (जिल्हा परिषद शाळा सौंदाळे बाऊल), विनित देशपांडे (जिल्हा परिषद शाळा कोळंब क्रमांक १), परशुराम गुरव (जिल्हा परिषद शाळा असगणी क्रमांक १). इंग्रजी-ऋतुजा जंगले (जिल्हा परिषद शाळा बारगाव क्रमांक १), रामा गवस (केंद्र शाळा साटेली भेडशी), केतकी पाडगावकर (जिल्हा परिषद शाळा देवली बरची). विज्ञान ः सागर कुराडे (जिल्हा परिषद शाळा बायंगवडे), रविंद्र गुरव (जिल्हा परिषद शाळा कारिवडे भैरव), गिरीश गोसावी (वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव), सामाजिक शास्त्र ः किशोर कदम (जिल्हा परिषद शाळा ओसरगाव क्रमांक १), रविंद्र गुरव (जिल्हा परिषद शाळा कारिवडे भैरव), सिताराम म्हाडगुत (जिल्हा परिषद शाळा हळदीचे नेरूर क्रमांक १). नववी ते दहावी ः भाषा- अमर पवार (कळसुली इंग्लिश स्कूल), रूपेश परब (जिल्हा परिषद शाळा न्हावेली क्रमांक ३), अंकुश चौरे (श्री जनता विद्यालय तळवडे). गणित ः राजाराम फर्जद (माध्यमिक विद्यालय सोनावल), महेश चव्हाण (एस के पाटील विद्यामंदिर केळूस), आनंदा बामणीकर (दोडामार्ग इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज). इंग्रजी ः प्रदीप सावंत (माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली), रूपेश परब (जिल्हा परिषद शाळा न्हावेली क्रमांक ३), इम्रान नवाब (एस. व्ही. कुलकर्णी माध्यमिक विद्यामंदिर). विज्ञान ः सहदेव पालव (एस. एम. विद्यालय कुंभवडे), सत्यपाल लाडगावकर (पेंढारी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय पेंढारी), अर्चना पाटील (न्यू इंग्लिश स्कूल मातोंड). सामाजिक शास्त्र ः दीपक जाधव (ओझर विद्यामंदिर कांदळगाव), राजश्री मोंडकर (जिल्हा परिषद शाळा जामसंडे क्रमांक १), दीपक डवर (जिल्हा परिषद शाळा सौंदाळे बाऊल). अकरावी ते बारावी ः भाषा- सुषमा मांजरेकर (विद्याविहार इंग्लिश स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज आरोस), रूपेश परब (जिल्हा परिषद शाळा न्हावेली क्रमांक ३), शीतल देवरकर (जिल्हा परिषद शाळा रामेश्वर). गणित ः विधी मुद्राळे (माध्यमिक विद्यालय कासार्डे), धनश्री देवधर (श्रीराम ज्युनिअर कॉलेज पडेल), रूपेश परब (जिल्हा परिषद शाळा न्हावेली क्रमांक ३). इंग्रजी ः रूपा कामत (विद्याविहार इंग्लिश स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज आरोस), रूपेश परब (जिल्हा परिषद शाळा न्हावेली क्रमांक ३), मानसी धामापूरकर (अ. शि. दे, टोपीवाला हायस्कूल). विज्ञान ः राजेंद्र काळे (एस. एम. हायस्कूल कणकवली), पोपट कदम (कुडाळ हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज), नुतन भावे (सायन्स ज्युनिअर कॉलेज आचिर्णे), सामाजिक शास्त्र ः धनश्री देवधर (श्रीराम ज्युनिअर कॉलेज पडेल), हसन खान (एस. के. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण), श्रावण गवळी (अ.शि.दे, टोपीवाला हायस्कूल). अध्यापक विद्यालय गट-भाषा ः नागेश कदम (सुनितादेबी टोपीवाला अध्यापक विद्यालय), निलम लोके (के. एम. एस. अध्यापक विद्यालय), मारूती कांबळे (विद्याविकास अध्यापक विद्यालय). गणित ः शीतल देवलकर (जिल्हा परिषद शाळा रामेश्वर). सामाजिक शास्त्र ः दीपाली आचरेकर (के. एम. एस. अध्यापक विद्यालय), प्रदीप बळवी (के. सी. इंगेट्राऊट नाईक अध्यापक विद्यालय), गणेश तुंगार (विद्याविकास अध्यापक विद्यालय). शिक्षण प्रशिक्षणाशी निगडीत आधुनिक विचार प्रवाह ः प्रतापसिंह यादव (कै. सौ. इंगेट्राऊट नाईक अध्यापक विद्यालय), सुचिता गायकवाड (कै. सौ. इंगेट्राऊट नाईक अध्यापक विद्यालय), तृतीय प्रतिभा चव्हाण (विद्याविकास अध्यापक विद्यालय).
----
राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्यातील चार शिक्षक
जिल्ह्यातून प्रथम आलेल्या शिक्षकांचे व्हिडिओ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. जिल्ह्यातील चार शिक्षकांनी या राज्यस्तरीय स्पर्धेत बाजी मारली. उच्च माध्यमिक विभाग गणित विषयात विधी मुद्राळे (कासार्डे माध्यमिक विद्यालय) यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. उच्च माध्यमिक भाषा विभागात सुषमा मांजरेकर (विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस) यांनी राज्यात तृतीय क्रमांक पटकावला. निवेदिता चव्हाण (जिल्हा परिषद शाळा पेंडूर) यांनी तिसरी ते पाचवी गटात राज्यात तृतीय तर परशुराम गुरव (असगणी जिल्हा परिषद शाळा) यांनी सहावी ते सातवी गटात राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. राज्यस्नेय स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ५० हजार, द्वितीय ४० हजार तर तृतीय तीस हजाराचे पारितोषिक, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे होते. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १० हजार, द्वितीय ९ हजार तर तृतीय ८ हजार रुपये असे पारितोषिक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.