

16263
अनुभवाची शिदोरी घेऊन वाटचाल करा
तहसीलदार वीरसिंग वसावे ः कुडाळमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ ः जेष्ठ सेवानिवृत्तांनी अनुभवाची शिदोरी घेऊन वाटचाल करावी. ज्यांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांच्यासाठी मार्गदर्शन करा असे प्रतिपादन येथील तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमात केले.
सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ शाखा कुडाळ संघाच्यावतीने कार्यकारणी मेळावा तसेच ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सेवानिवृत्तांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. याचे उद्घाटन तहसीलदार वसावे यांच्या हस्ते झाले. यावेळी कुडाळ अध्यक्ष सुरेश कोरगावकर, संघाचे सचिव शरद कांबळी, मनोहर आंबेकर, प्रकाश सावंत, चंद्रकांत अणावकर, भरत सावंत, दिलीप धालवलकर, तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.
तहसीलदार वसावे म्हणाले, ‘‘प्रशासनात ज्यांचे मार्गदर्शन लाभले, त्यांना मार्गदर्शन करणे शक्य नाही. तुमच्याकडून मी भरपूर काही शिकलो. निवृत्तीनंतर आपले वेगळे जीवन सुरू करा. ज्यांना आपल्या मार्गदर्शनाची गरज असेल अशांना मार्गदर्शन करा. तुम्ही आपला वेळ वाचनकडे घातला पाहिजे. एकमेकांची सुखदुःखे शेअर केली पाहिजेत. ज्येष्ठांचे अनेक ग्रुप आहेत. त्याच्या माध्यमातून एकत्र या. मोबाईलमुळे आता संवाद कमी झाला आहे. संवाद वाढवा.
कुडाळ अध्यक्ष सुरेश कोरगावकर यांनी अहवाल वाचन करताना विधानसभेमध्ये जेष्ठांना प्रतिनिधित्व देणे. ज्येष्ठांचे जे काय मूलभूत प्रश्न आहेत, त्याबाबत शासन दरबारी आवाज उठवणे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ७५ वर्षे पूर्ण झालेल्याचा सत्कार करण्यात आला. यामध्ये श्रीधर पाटकर, चंद्रकांत पाताडे, सुरेश म्हाडदळकर, एकनाथ टेमकर, रवींद्र वालावलकर, उत्तम परब, सीताबाई शिंदे, विश्वनाथ राऊळ, कृष्णा धुरी, मोहन देऊलकर, विठ्ठल मसगे आदींचा सत्कार करण्यात आला.
---
ज्येष्ठांवर सतत अन्याय ः अणावकर
ज्येष्ठ नेते सावळाराम अणावकर यांनी, शासन दरबारी न्याय्य मागण्यासाठी आपली ताकद दाखवणे काळाची गरज आहे. ज्या आपल्या मागण्या आहेत, त्या मान्य करण्यासाठी एका छत्राखाली सर्वांनी आले पाहिजे, असे सांगितले. ज्येष्ठ नेते चंद्रकांत अणावकर यांनी, ज्येष्ठांवर सातत्याने अन्याय झाला आहे. याचा जाब येत्या अदालतमध्ये विचारणार आहोत. जिल्हा परिषदमध्ये काही अधिकारी मस्तीखोर झाले आहेत. त्यांना आपली ताकद दाखवणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.