निवे आश्रमशाळेला वॅाशिंग मशिन भेट

निवे आश्रमशाळेला वॅाशिंग मशिन भेट

Published on

16137

जयंत काकडे
जिल्ह्यात द्वितीय
सावर्डे : महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्यावतीने आयोजित केलेल्या शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत सावर्डेतील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मराठी भाषा शिक्षक जयंत काकडे यांनी रत्नागिरी जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला. महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित नववी व दहावी या भाषा विषय गटात काकडे यांनी विरामचिन्हे या घटकावर आधारित अतिशय अभ्यासपूर्वक दर्जेदार व्हिडिओची निर्मिती करून सहभाग घेतला. त्यांनी केलेल्या या उत्कृष्ट शैक्षणिक व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट अशा मार्गदर्शनाची सोय निर्माण झाली आहे.
----------
निवे आश्रमशाळेला
वॅाशिंग मशिन भेट
साडवली : भाजप महिला मोर्चा संगमेश्वर तालुक्याच्यावतीने निवे बुद्रुक येथील आश्रमशाळेला सेवासप्ताहानिमित्त वॅाशिंग मशिन भेट देण्यात आली. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव शिल्पा मराठे व महिला मोर्चाच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे यांच्या हस्ते ही भेटवस्तू शाळेकडे सुपूर्द करण्यात आली. हा कार्यक्रम जिल्हा उपाध्यक्ष शीतल पंडित व तालुका सरचिटणीस अॅड. स्वाती गोडे यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने यशस्वी झाला. या वेळी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद अधटराव, जिल्हा चिटणीस दादा ढेकणे, तालुकाध्यक्ष रूपेश कदम, स्नेहा फाटक, सुशांत मुळ्ये, मुख्याध्यापक विजय पाटील आदी उपस्थित होते.
-----------
अल्पसंख्यांक वस्तीसाठी
५० लाखांचा निधी मंजूर
साडवली : अल्पसंख्यांक विभागाच्या माध्यमातून संगमेश्वर तालुक्यातील अल्पसंख्यांक वस्तीत कब्रस्तान सुशोभीकरणासाठी सुमारे ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये आंगवली, हातीव, कसबा, फणसट, सांगवे, रामपेठ आदी वस्तींचा समावेश आहे. या योजनेमुळे अल्पसंख्यांक समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे. कब्रस्तानच्या सुशोभीकरणामुळे परिसराचा विकास होईल तसेच समाजातील धार्मिक व सांस्कृतिक महत्वाच्या ठिकाणांचे संवर्धन होईल. ही महत्वाकांक्षी योजना आमदार शेखर निकम यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे शक्य झाली आहे.
-----
दाभिळ येथे
पोषण आहार सप्ताह
गावतळे ः एकात्मिक बालविकास सेवा योजना दाभोळ प्रकल्पांतर्गत १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह फणसू बीटमार्फत दापोली तालुक्यातील मॉडर्न हायस्कूल दाभिळ येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला दाभिळ गावच्या सरपंच फातिमा मोहिमतुले, माजी सरपंच रेश्मा नेवरेकर, फणसू बीटच्या पर्यवेक्षिका उज्ज्वला पवार, मॉडर्न हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मुल्ला, शिक्षक अजित तांबे व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. पोषण सप्ताहातून आहाराविषयी जनजागृती करण्यासाठी पर्यवेक्षिका उज्ज्वला पवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. अंगणवाडी सेविका अस्मिता वानरकर यांनी पोषण आहाराविषयी माहिती दिली.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com