‘त्या’ कंपनीला ‘प्रदूषण’चे पाठबळ

‘त्या’ कंपनीला ‘प्रदूषण’चे पाठबळ

Published on

16260

‘त्या’ कंपनीला ‘प्रदूषण’चे पाठबळ

केळुसवासीयांचा आरोप; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ४ ः ग्रामस्थांचा विरोध झुगारुन केळुस (ता.वेंगुर्ले) येथील एका कंपनीच्या मनमानी कारभाराला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ सहकार्य करीत असल्याचा आरोप केळूस दशक्रोशी ग्रामस्थांनी केला. याविरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत उपोषण छेडले आहे.
केळुस येथील संबंधित कंपनी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभाराकडे लक्ष वेधण्यासाठी केळुस सरपंच योगेश शेटे, आनंद गावडे, गोविंद केळुस्कर, सुनील पाटकर यांच्या नेतृत्वाखाली केळुस पंचक्रोशीतील ग्रामस्थानी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, ‘‘केळूस येथील एक कंपनी दुषीत पाणी येथील समुद्रात सोडत असल्याने पर्यावरणाची हानी होत असून प्रदूषण वाढले आहे. याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. यासाठी तेथील ग्रामस्थांनी या विरोधात ऑगस्टमध्ये आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर १६ ऑगस्टला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली होती. यावेळी झालेल्या निर्णयानुसार कंपनीने त्रुटींची पूर्तता केल्याची खात्री महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ग्रामस्थांसह संयुक्तरीत्या करावी आणि त्यानंतर पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश दिले होते. झालेल्या पाहणीत प्रदूषण मंडळाच्या सूचनांचे पालन कंपनीकडून झाले नसल्याची बाब समोर आली. आणि असे असताना १३ सप्टेंबरला प्रदूषण मंडळाने पाईप लाईनने समुद्रात पाणी सोडण्यास कंपनीला परवानगी दिली असल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे.
पाईपलाईन जोडणीला मच्छिमारांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हा आदेश रद्द करावा, कंपनीतून बाहेर पडणाऱ्या दूषीत पाण्यावर प्रक्रिया करुन त्या पाण्याचा कंपनीनेच पुनर्वापर करावा, कंपनीतील घनकचरा कंपनीच्या बाहेर सोडण्यावर निर्बध लादण्यात यावेत, त्यांची कंपनीतच विल्हेवाट लावण्यात यावी, दुर्गंधीयुक्त वासावर नियंत्रण करण्यात यावे, कोणत्याही परिस्थितीत कंपनीचे दूषित पाणी समुद्रात अथवा उघड्यावर सोडू नये, आदी मागण्यांसाठी आज केळूस, कालवी, म्हापण, खवणे, मळई, आंदुर्ले, पाट येथील शेकडो ग्रामस्थ, मच्छिमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येत नाहीत. तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
-------------------------
जैवविविधतेला धोका
स्थानिकांच्या तक्रारीनुसार १३ ऑगस्टला या कंपनीच्या उत्पादनाला निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, १३ सप्टेंबरला पुन्हा कंपनी सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे मच्छिमार, शेतकरी आणि पर्यावरण प्रेमी यांच्यात नाराजी असून सागरी जैवविविधता धोक्यात येणार असल्याकडे जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com