प्रसन्न कांबळींचा सन्मान

प्रसन्न कांबळींचा सन्मान

Published on

rat२p३२.jpg-
२४N१५५७८
रत्नागिरी : पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे शब्दकोडेकार प्रसन्न कांबळी यांचा सत्कार करताना सोबत नीलेश राणे.

शब्दकोडेकार प्रसन्न कांबळींचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : येथील शब्दकोडेकार प्रसन्न रंगनाथ कांबळी यांनी ६२ हजार ५०० चौकोनांचे कोडे पूर्ण केल्याबद्दल त्यांची इंडिया बुकमध्ये नोंद झाली. याबद्दल जागतिक पर्यटनदिनी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था आणि लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी आयोजित कार्यक्रमात त्यांचा सन्मान माजी खासदार नीलेश राणे यांच्या करण्यात आला.
हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे हा कार्यक्रम झाला. या प्रसंगी जि. प. चे माजी अध्यक्ष उदय बने, कोकणभूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, पर्यटन संस्थेचे संस्थापक राजू भाटलेकर, इन्फिगो आयकेअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. कांबळी यांनी या कोड्यामध्ये १३ हजार ८८६ आडवे शब्द आणि १३ हजार ८४५ उभे शब्द लिहिले. त्यांनी लिम्का बुकमध्ये एकदा व इंडिया बुकमध्ये दोनदा असा तीनवेळा राष्ट्रीय विक्रम केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com