भजनातून होणारे नामस्मरण पुढील पिढ्यांना दिशादर्शक

भजनातून होणारे नामस्मरण पुढील पिढ्यांना दिशादर्शक
Published on

16298

भजनातून होणारे नामस्मरण पुढील पिढ्यांना दिशादर्शक
दत्ता सामंतः मालवणात भजन महोत्सवाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ४ : भैरवी मंदिरातील मित्रमंडळाने सलगपणे बारा वर्षे भजन सेवेतून देवीची आराधना आणि आशिर्वाद मिळविले आहेत. अशाप्रकारे परमेश्वर भेटीचा आनंद भजनात तल्लीन होणाऱ्या भाविकांना होत असतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात भजनातून होणारे नामस्मरण पुढील पिढ्यांना दिशादर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन उद्योजक दत्ता सामंत यांनी येथे केले.
शहरातील बाजारपेठेतील संतसेना महाराज मार्गावरील भैरवी देवालयातील भजन महोत्सवाचे उद्घाटन उद्योजक सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाभिक समाजाचे नेते विजय चव्हाण होते. दसऱ्याला १२ ऑक्टोबरला सोहळ्याचा समारोप होणार आहे. प्रास्ताविक ॲड. पलाश चव्हाण यांनी केले. स्वागत भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळाचे अध्यक्ष अंकुश चव्हाण व नाभिक समाज माजी तालुकाध्यक्ष विजय शिवा चव्हाण यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, स्मृती कांदळगावकर, उद्योजक अनिल मालवणकर, प्रदीप मुंबरकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर, दीपक पाटकर, राजन सकपाळ, आनंद आचरेकर, प्रतिभा चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी बुवा कृष्णा कदम, दत्ता सामंत, प्रदीप मुंबरकर यांचा सत्कार मंडळाच्यावतीने विजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
शहरात असलेल्या या मंडळाच्या उपक्रमांची माहिती पाहून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि पुढच्या पिढीसाठी नविन दिशा देण्यासाठी उभे केलेले काम दिसून येत आहे. मंदिराच्या सुशोभिकरणासाठी आवश्यक असणारे सर्व सहकार्य आपण करणार असल्याचेही श्री. सामंत यांनी सांगितले. सुदेश आचरेकर यांनी मंडळाच्यावतीने नाविन्यपूर्ण उपक्रम दरवर्षी आयोजित करून नामाकिंत भजनीबुवांना मंदिरात आणून त्यांच्याकडून देवीची भजनरूपी सेवा करून घेतली जात असताना त्याचा फायदा सर्व समाजाला होत असल्याने मंडळाचे कार्य गौरवणीय असल्याचे सांगितले. महेश कांदळगावकर यांनी या मंडळाने आपल्याला ज्या ज्यावेळी साद दिली त्या त्यावेळी आपण त्यांच्यासाठी पुढाकार घेतला आहे. मंडळाचे कार्यकर्ते दिशादर्शकपणे कार्यरत असून आपण त्यांच्या पाठिशी सदैव राहणार आहोत, असे सांगितले.
महोत्सव यशस्वीतेसाठी उदय चव्हाण, रोहन चव्हाण, कांता चव्हाण, सुर्या चव्हाण, उत्तम चव्हाण, ललीत चव्हाण, हेमंत चव्हाण, किशोर चव्हाण, बाली चव्हाण, लवू चव्हाण, दिलीप वायंगणकर, रामकृष्ण चव्हाण, उद्देश चव्हाण, दिपक चव्हाण, जगदीश वालावलकर, कौशल वस्त आदींनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com