सावंतवाडी रुग्णालयास कार्डिओग्राफ रुग्णवाहिका न मिळाल्यास आंदोलन

सावंतवाडी रुग्णालयास कार्डिओग्राफ रुग्णवाहिका न मिळाल्यास आंदोलन
Published on

16300

कार्डिओग्राफ रुग्णवाहिका
न मिळाल्यास आंदोलन

खान ः सावंतवाडी रुग्णालयाचा प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ४ ः सावंतवाडी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय येथे कार्डिओग्राफ रुग्णवाहिका नसल्याने येथे येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होते. रुग्णांना बऱ्याच वेळा जीवही गमवावा लागतो. उपजिल्हा रुग्णालय येथे उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका खूप जुन्या व तांत्रिक बिघाडामुळे बंद आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा रुग्णांना याचा फटका बसत आहे. याची दखल घेऊन येत्या आठ दिवसांत ही रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी; अन्यथा सावंतवाडीतील नागरिकांसह उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे उपोषणाला बसणार असल्याचे पत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुख रियाज खान यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. येथील बऱ्याच अत्यवस्थ रुग्णांना गोवा बांबोळी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येते. मात्र, कार्डिओग्राफ रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने याचा नाहक त्रास रुग्ण तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना होत आहे. आरोग्याचा हा गंभीर प्रश्न असल्याने तात्काळ याबाबत कार्यवाही करण्याची सूचना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com