उमेद कर्मचाऱ्यांचा वैभववाडीत मोर्चा

उमेद कर्मचाऱ्यांचा वैभववाडीत मोर्चा
Published on

N16319

उमेद कर्मचाऱ्यांचा वैभववाडीत मोर्चा
जोरदार घोषणाबाजीः शेकडो महिलांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ४ः उमेद अभियान स्वतंत्र विभाग व्हावा, ते कायम सुरू ठेवावे यासह विविध मागण्यांसाठी उमेदच्या शेकडो महिलांनी आज येथे मोर्चा काढला. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी करीत शहर दणाणून सोडले.
राज्यात उमेद अभियान सुरू आहे. हे अभियान २०२६ मध्ये बंद करण्यात येणार असल्याची माहिती उमेदमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळाल्याने त्यांच्यामध्ये नाराजी आहे. त्यामुळे उमेद अभियानात काम करणाऱ्या महिलांनी आज वैभववाडी शहर ते तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालयापर्यत असा मोर्चा काढला. यावेळी उमेद अभियान कायम करा, उमेद अभियानाचा स्वतंत्र विभाग करा, आमच्या मागण्या मान्य करा, उमेद अभियानाचा विजय असो, अशा घोषणा देत शहर दणाणून सोडले.
यावेळी महिलांनी सतंप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. उमेद अभियान हे २०१७ पासून सुरु असून आम्ही या अभियानात काम करीत आहोत. तालुक्यातील शेकडो कुटुंबे या अभियानावर अवलंबून आहेत. आम्ही प्रामाणिकपणे गेली सहा सात वर्ष काम करीत आहोत. विविध रोजगार, व्यावसायीक उपक्रम निर्माण करून महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. परंतु, जर हे अभियान २०२६ मध्ये बंद झाले तर महिला सक्षमीकरणाची घडी विस्कटणार आहेत. त्यामुळे शासनाने हे अभियान सुरू ठेवावे, अशी आमची मागणी आहे, असे मत उमेदच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com