विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीस न्यायालयीन कोठडी

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी
पतीस न्यायालयीन कोठडी
Published on

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी
पतीस न्यायालयीन कोठडी

मालवण, ता. ४ : शहरातील बसस्थानक येथील एका डायग्नोस्टिक लॅबमध्ये काम करणाऱ्या सौभाग्यश्वरी गोवेकर (वय ३५, रा. धुरीवाडा) या विवाहितेचा जाळून खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिचा पहिला पती सुशांत सहदेव गोवेकर (वय ४०) रा. धुरीवाडा याला आज येथील न्यायालयात हजर केले असता पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानुसार त्याची रवानगी सावंतवाडी कारागृहात केली आहे.
पूर्वाश्रमीची प्रीती केळुसकर ही विवाहिता बसस्थानक येथील एका लॅबमध्ये काम करत असताना तिचा पहिला पती सुशांत गोवेकर याने लॅबमध्ये जात तिच्या अंगावर प्लॅस्टिक बॉटलमधून आणलेले पेट्रोल ओतून लायटरने पेटवून दिले. गंभीररीत्या भाजलेल्या प्रीती यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. ही घटना २५ सप्टेंबरला घडली होती. याप्रकरणी येथील पोलिसांनी सुशांत गोवेकर याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न करणे, खून करणे, ज्वलनशील पदार्थ टाकून गंभीर दुखापत करणे यासह अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करत अटक केली होती. त्याला ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या कालावधीत पोलिसांनी त्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश महेश देवकते यांनी पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याला सावंतवाडी येथील कारागृहात नेण्यात आले आहे. याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com