मुली, महिला यांच्या छेडछाडीवर कडक लक्ष ठेवा

मुली, महिला यांच्या छेडछाडीवर कडक लक्ष ठेवा
Published on

-rat४p३६.jpg-
२४N१६३५४
दापोली ः सभेत उपस्थित हॉटेल्स आणि रेस्टॉरंटचे चालक-मालक व दापोली पोलिस निरीक्षक विवेक अहिरे.
------------
छेडछाडीचे प्रकार घडणार नाहीत
याची काळजी घ्या ः आहिरे

पर्यटकांबाबत पोलिसांच्या व्यावसायिकांना सूचना

सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ४ ः तालुक्यातील लॉजमध्ये प्रवासी महिलांची छेडछाड होणार नाही या दृष्टीने लक्ष द्या. अल्पवयीन मुले व मुली यांच्या नावे भाड्याने रूम देण्यात येऊ नये, प्रवाशांचे ओळखपत्र, मोबाईल नंबर, वाहन नंबर यांची माहिती घेऊन स्वतंत्र रेकॉर्ड जतन करा, परदेशी नागरिक वास्तव्यास असल्यास त्यांचा सी फॉर्म भरून पोलिस ठाण्यात माहिती देण्यात यावी. अशा सक्त सूचना दापोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अहिरे यांनी दिल्या.
पोलिस ठाणे हद्दीतील हॉटेल व लॉजेस व्यावसायिक व चालक-मालक यांच्याबरोबर बैठक झाली. सध्या पर्यटन हंगाम सुरू होत आहे. नवरात्रोत्सव सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सूचना दिल्या आहेत. या सूचना व नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई केली जाईल, असे अहिरे यांनी सांगितले. या वेळी लॉज, परमिट रूम, बार रेस्टॉरंट, परवाना कक्ष आस्थापनधारक यांनी आस्थापना परवानातील अटीशर्तींचे पालन करावे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, चोरी, घरफोडी दृष्टीने सतर्कत राहण्यास सांगितले.
---
कोट
हॉटेल्स् रात्री साडेअकरापर्यंत बंद करावीत. त्यानंतर चालू राहणाऱ्या हॉटेल अथवा रेस्टॉरंट चालक-मालकावर कारवाई करण्यात येईल.
पोलिस निरीक्षक विवेक अहिरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com