उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकाला भाजपाने घेतले फैलावर
उद्योग केंद्र महाव्यवस्थापकाला
भाजप कार्यकर्त्यांनी घेतले फैलावर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : साडवली, देवरूख येथे विश्वकर्मा सामूहिक सुविधा केंद्र चार वर्षे ठप्प आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केंद्राच्या अध्यक्षाने उपोषण सुरू केले; परंतु ज्या उद्योग विभागाने पैसे दिले, मशिनरी दिली त्यांनी पुन्हा उद्योग करण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व सहकाऱ्यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकाला फैलावर घेतले. आमच्या राज्यातील सरकारला बदनाम करू नका, जबाबदारीने काम करता. २४ तासांत यावर तोडगा काढून उपोषण थांबवा, असा इशारा जिल्हाध्यक्ष सावंत यांनी महाव्यवस्थापकाला दिला आहे.
हा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आज उपोषणकर्ते अध्यक्ष कमलाकर मसुरकर यांची भेट घेतली. तिथून महाव्यवस्थापक हणबर यांना फोन केला. उपोषण मिटवण्यासाठी प्रयत्न केला; परंतु महाव्यवस्थापकांची भाषा ऐकून सावंत यांनी थेट जे. के. फाईल्स येथे जिल्हा उद्योगकेंद्रालाच भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत मंडल अध्यक्ष विवेक सुर्वे, उमेश देसाई, राजू भाटलेकर, बावा नाचणकर आदी उपस्थित होते.
राजेश सावंत यांनी सुरवातीला महाव्यवस्थापकांना प्रश्नांचा भडीमार करून भंडावून सोडले. कोणत्याही प्रश्नाला ते समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत. उपोषण थांबावे, बंद पडलेला उद्योग चालू राहण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता. राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरीचे आहेत. त्यांच्या उद्योग विभागाने दखल न घेतल्याने केंद्राचे अध्यक्ष कमलाकर मसुरकर यांनी २ ऑक्टोबरला उपोषण सुरू केले. देवरूख येथेही उपोषण करण्यात आले होते; मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली. उद्योगच सुरू झाला नाही आणि मशिनरीचा पार्ट गेला. विजेचे भरमसाठ बिल आले. लोहारकाम करणाऱ्या कारागिरांनी सव्वा कोटी पदरचे दिले; मात्र चार वर्षांत त्यांना उत्पन्नच मिळाले नाही तर कर्ज परतफेड कशी करणार, असे सवाल राजेश सावंत यांनी महाव्यवस्थापकांना विचारले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

