जिल्ह्यात २३१ छतावरील सौरप्रकल्प कार्यान्वित
जिल्ह्यात २३१ छतावरील सौरप्रकल्प कार्यान्वित
प्रधानमंत्री सूर्यघर योजना ; वीजबिल होणार शून्य, रत्नागिरीत १८० प्रकल्प
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : घरगुती वीजग्राहकांना मासिक ३६० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये रत्नागिरी मंडलात ८४० किलोवॅट क्षमतेचे २३१ छतावरील सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे या ग्राहकांचे मासिक वीजबिलदेखील शून्य झाले आहे. यात सर्वाधिक १८० प्रकल्प रत्नागिरी शहरात सुरू झाले आहेत.
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळवता येते. या योजनेत भाग घेतलेल्या प्रत्येक वीजग्राहकांना त्यांनी मागणी केलेल्या भारानुसार किमान ३० हजार ते कमाल रू. ७८ हजारापर्यंत अनुदान शासनाकडून मिळण्याची तरतूद आहे. हे प्रकल्प उभारणीसाठी सवलतीच्या दराने कर्ज सुविधा बँकांमार्फत उपलब्ध करून दिली जात आहे. प्रकल्पांतून गरजेपेक्षा वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून विकत घेण्यात येत आहे. त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात कमी (समायोजित) केली जात आहे. घरगुती ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी महावितरणकडून केले जात आहेत.
------
प्रसारासाठी मेळावे
घरगुती ग्राहकांनी या योजनेत अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणतर्फे या योजनेची माहिती देण्यासाठी विविध ठिकाणी मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

