सावंतवाडी-भटवाडी येथे घरातून रोकड लंपास
16397
सावंतवाडी-भटवाडी येथे
घरामधून रोकड चोरीस
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः येथील भटवाडी परिसरात राहणाऱ्या अरविंद सहदेव केरकर यांच्या घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने चार हजाराची रोकड पळवली. चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात यश न आल्यामुळे कौले काढून त्यांनी घरात प्रवेश करून ही चोरी केली. ही घटना काल (ता.३) रात्री साडेदहाच्या सुमारास उघड झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की ः भटवाडी परिसरात केरकर यांचे घर आहे. काही कामानिमित्त ते काल रात्री बाजारात गेले होते. यावेळी घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाची कुलूप तोडले. परंतु, आतुन दुसरे कुलूप असल्यामुळे त्याला दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्याने बाजूला असलेले शिडी घेऊन छपरावरील कौले काढली आणि आत प्रवेश करून एक कपाट फोडून चार हजाराची रोकड पळवली. मुख्य कपाट फोडण्यास त्याला अपयश आल्यामुळे त्यांचे दागिने सुखरूप राहिले. दरम्यान, रात्री दहा वाजण्याच्या सुमारास केरकर घरी आल्यानंतर त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे कळले. त्यांनी बाजूला राहणार्यांना याची कल्पना दिली. तसेच पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी हवालदार हनुमंत धोत्रे व त्यांचे सहकारी दाखल झाले. त्यांनी तपास केला. यावेळी संबंधित चोरटा हा कौले काढून घरात उतरल्याचे निष्पन्न झाले. केरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे तपासी अंमलदार प्रमोद पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

