पालकांनो, आपल्या मुलांसाठी ‘सीसीटीव्ही’ बना ः तांबे
16471
पालकांनो, आपल्या मुलांसाठी
‘सीसीटीव्ही’ बना ः तांबे
आचरा हायस्कूलमध्ये पालकांचे प्रबोधन
आचरा, ता. ५ ः बदलत्या परिस्थितीनुसार मुलांसमोर अनेक संकटे, आव्हाने येत आहेत. यासाठी पालकांनी सजग होऊन मुलांच्या दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी ‘सीसीटीव्ही’ बनून काम करा, असे आवाहन आचरा पोलिस ठाण्याचे हवालदार सुदेश तांबे यांनी केले.
आचरा हायस्कूल येथे आयोजित पालक सभेत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुलांबाबत पालकांनी कोणती सावधगिरी बाळगावी, याबाबत तांबे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास स्थानिक स्कूल समिती अध्यक्षा नीलिमा सावंत, सदस्य राजन पांगे, बाबाजी भिसळे, अर्जुन बापर्डेकर, संजय पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक घुटूकडे, मधुरा माणगावकर, दत्तात्रय जाधव आदींसह बहुसंख्येने पालक उपस्थित होते. तांबे यांनी मोबाईलमुळे गुन्ह्यात वाढ होत आहे. वाईट गोष्टींसाठी मोबाईलचा वापर होत आहे. यासाठी पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर बंधने आणणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक परब यांनी केले. दत्तात्रय जाधव यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

