

16489
हिंदळेवासीयांच्या मागणीनुसार
विकासकामांना लवकरच निधी
नीतेश राणे ः प्रश्न सोडविण्याची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. ५ ः हिंदळे गावासाठी तातडीने ग्रामसेवक दिला जाईल. येथील विकासकामांसाठी ग्रामस्थांच्या मागणीनुसार निधी दिला जाईल, अशी ग्वाही आमदार नीतेश राणे यांनी ग्रामस्थांना दिली.
हिंदळे-मोर्वे येथे महावितरण कंपनीतर्फे भूमिगत वीजवाहिनीच्या कामाचा प्रारंभ आमदार राणे यांच्या हस्ते (शुक्रवारी) करण्यात आला. यावेळी हिंदळे येथील महिला व ग्रामस्थांनी आमदार राणे यांच्याकडे गावातील समस्या सोडविण्याची मागणी केली. त्याप्रमाणे आमदार राणे यांनी यावेळी महिला व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. आमदार राणे यांचे महिला व ग्रामस्थांतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप माजी तालुकाध्यक्ष प्रकाश राणे, देवगडचे माजी सभापती सुनील पारकर, जिल्हा परिषद माजी सदस्या सावी लोके, मिठबाव सरपंच भाई नरे, निखिल तारी, सुचिता परब, नाना राणे, अनुजा जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी हिंदळेच्या ग्रामसेविका बांधकाम कामगारांच्या नव्वद दिवसांच्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करत नसल्याने कामगार सुविधांपासून वंचित आहेत, याकडे अनुजा जाधव यांनी लक्ष वेधले. बांधकाम कामगारांना प्रमाणपत्रावर तत्काळ स्वाक्षरी मिळावी, अशी मागणी केली. इतरही तक्रारी यावेळी महिलांनी केल्या. याबाबत आमदार राणे यांनी संबंधितांची तत्काळ बदली करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बहुसंख्य महिला व ग्रामस्थ उपस्थित उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.