‘मराठी भाषेला अभिजात दर्जा निर्णयाची अंमलबजावणी व्हावी’
16455
‘मराठी भाषेला अभिजात दर्जा
निर्णयाची अंमलबजावणी व्हावी’
‘कोमसाप’ सावंतवाडी शाखेची बैठक
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाचे स्वागत कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्यावतीने आज करण्यात आले. आता या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
‘कोमसाप’ शाखा सावंतवाडीच्या आज येथे झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, या ‘कोमसाप’सह महाराष्ट्रातील साहित्यिक आणि मराठी भाषाप्रेमींच्या कित्येक वर्षांच्या मागणीला अखेर यश मिळाले. या विशेष कार्याबद्दल शिक्षणमंत्री केसरकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कार्यकारिणीने अभिनंदन करण्याचे ठरविण्यात आले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असून, त्याची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘कोमसाप’ सावंतवाडी शाखेच्या कार्यकारिणीची बैठक येथील पर्णकुटी विश्रामगृह येथे शुक्रवारी सायंकाळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उषा परब, जिल्हा कार्यकारिणी कोषाध्यक्ष भरत गावडे, ॲड. अरुण पणदूरकर, ॲड. नकुल पार्सेकर, दीपक पटेकर, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत-भोसले, मंगल नाईक आदी उपस्थित होते. यावेळी १३ ऑक्टोबरला सावंतवाडी येथे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले. वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या सदस्यांचा गुणगौरव करण्याचे ठरले. संस्थेच्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

