जिल्ह्यातील ३२ सुरक्षारक्षक ६ महिने मानधनाविना
जिल्ह्यातील ३२ सुरक्षारक्षक मानधनाविना
उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय; पालकमंत्र्यांना निवेदनाद्वारे साकडे
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ५ ः जिल्ह्यातील उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील ३२ कर्मचारी गेल्या सहा महिन्यापासून मानधनाविना आहेत. पगार न झाल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. दरम्यान, याबाबत जिल्ह्यातील सुरक्षारक्षकांनी पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन दिले असून, मानधनाचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालये या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. गेली चार वर्षे हे सुरक्षारक्षक वेगवेगळ्या तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये कार्यरत आहेत. या सुरक्षारक्षकांना शासननिर्णयानुसार वेतन न देता त्यात कपात करून तुटपुंजे मानधन दिले जात आहे. सर्व सुरक्षा सर्वसाधारण कुटुंबातील आहेत. त्यांना या तुटपुंज्या वेतनातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागत आहे. अशातच मागील सहा महिन्यांपासून या सुरक्षारक्षकांना मासिक वेतन मिळालेले नाही. अनेक सुरक्षारक्षक हे घरातील कमवती एकमेव व्यक्ती असल्याने त्यांना उधार, उसनवार करून आपला संसार चालवावा लागत आहे. आधीच तुटपुंजे वेतन त्यातही सहा महिने पगार मिळालेला नाही. त्यामुळे कुटुंबाची वाताहत होत असताना कामावरून कमी करणार असल्याचे समजल्याने हे सुरक्षारक्षक द्विधा मनःस्थितीमध्ये सापडले आहेत.
सुरक्षारक्षकांचा करार मार्च २०२४ मध्ये संपलेला असताना आता सहा महिने उलटले तरी अद्याप यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही कार्यवाही तत्काळ करताना सुरक्षारक्षकांना नोकरीत सातत्यपूर्ण ठेवून महिन्याच्या एका ठराविक तारखेस मासिक वेतन व्हावे अशी मागणी या सुरक्षारक्षकांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
--------------
कोट ः
आधीच तुटपुंजे मानधन तेही वेळेमध्ये नाही अशा स्थितीमध्ये उधार-उसनवार किती दिवस करायचे, कुटुंबाचा गाडा नेमका चालवायचा कसा? आता वयाची मध्यावस्था झाली आहे. शासनाने याचा प्राधान्याने सकारात्मक विचार करावा, अशी प्रतिक्रिया नाव न छापण्याच्या अटीवर सुरक्षारक्षकाने दिली.
एक सुरक्षारक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

